युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

डॉ. मनसुख मांडविया यांनी पॅरा-ऍथलीट्सच्या कामगिरीचे केले कौतुक; 2047 पर्यंत 'विकसित  भारत' लक्ष्‍य साध्य करण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी केले  आवाहन


पॅरिस पॅरालिम्पिकमधून परतलेल्या सहा पदक विजेत्यांचा केंद्रीय मंत्र्यांनी केला सत्कार

Posted On: 07 SEP 2024 6:06PM by PIB Mumbai

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांच्यासह केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्रीरक्षा खडसे यांनी आज  पॅरिस येथून परतलेल्या भारतीय पॅरा नेमबाजी दलाचा सत्कार नवी दिल्ली येथे  केला. या संघाने पॅरिसमध्ये एकूण चार पदकांची कमाई केली. पदक विजेत्या क्रीडापटूंमध्‍ये अवनी लेखरा (सुवर्ण), मनीष नरवाल (रौप्य), रुबिना फ्रान्सिस (कांस्य) आणि मोना अग्रवाल (कांस्य) यांचा समावेश आहे.

यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन  करताना डॉ. मांडविया यांनी खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक आणि त्यांना इतर मदत करणारा कर्मचारी वर्ग यांचे  अभिनंदन केले.डॉ. मांडविया  म्हणाले, "ज्यावेळी  तुम्ही खेळता, त्यावेळी तुम्ही केवळ स्वत:साठीच यश मिळवत नाही तर तुमच्या प्रशिक्षकांना, तुमच्या पालकांना आणि संपूर्ण देशाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी करीत असता.’’ ते पुढे म्हणाले, "आपल्या  सर्व 84 पॅरा-ॲथलीट्सची पॅरिसला जाण्यापूर्वी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  भेट घेतली होती. आता त्यापैकी  काही खेळाडू पदकांसह परतले आहेत तरकाहींनी मौल्यवान अनुभव मिळवला आहे. या अनुभवांमुळे  आपण आता  दृढनिश्चय करून पुढे जाऊ या, कारण सर्वांचे लक्ष्‍य सुवर्णपदकाकडे  असते.”

डॉ. मांडविया यांनी राष्ट्रीय प्रगतीचा आधारस्तंभ म्हणून क्रीडा क्षेत्र विकसित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. "आपण  2047 पर्यंत म्हणजे, स्वातंत्र्याला  100 वर्ष  पूर्ण होताना,  'विकसित  भारत'चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आगामी स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणे सुरू ठेवले पाहिजे. सरकार सर्व खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण सुनिश्चित करेल आणि आपल्या  खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना निरंतर  समर्थन देत राहील," असे ते म्हणाले.

पॅ‍राऑलिंपिक स्पर्धेत अवनी लेखरा हिने आर 2 - महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच1 प्रकारामध्ये 249.7 गुण मिळवून  पॅरालिम्पिकमध्‍ये नवीन  विक्रम प्रस्थापित केला आणि  सुवर्णपदक जिंकले. अवनी हिने  टोकियो 2020 मध्ये जिंकलेल्या विजेतेपदही कायम राखले. पॅरालिम्पिक किंवा ऑलिम्पिकमध्ये दोनदा सुवर्णपदक जिंकणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू ठरली.

या चमूमध्‍ये पॅरा-तिरंदाज राकेश कुमार आणि पॅरा-ॲथलीट प्रणव सूरमा देखील उपस्थित होते. राकेश याने  शीतल देवीसह मिश्र सांघिक कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले; पॅरालिम्पिकमधील कंपाउंड तिरंदाजीमध्ये भारतासाठी हे  पहिले पदक आहे. 39 वर्षीय राकेश चौथ्या स्थानावर राहिला आणि वैयक्तिक स्पर्धेत अवघ्‍या एका  गुणाने त्याचे  कांस्यपदक हुकले.

या स्पर्धेत प्रणवने पुरुषांच्या क्लब थ्रो एफ 51 स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आणि त्याच स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा आपला देशबंधू  धरमबीर याच्यासोबत त्याने पोडियम सामायिक  केला.

भारताने स्पर्धेमध्‍ये आज अखेरपर्यंत  एकूण 27 पदके (6 सुवर्ण, 9 रौप्य, 12 कांस्य) जिंकली.  टोकियो 2020 चा रौप्य पदक विजेता प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी – टी 64 स्पर्धेत 2.08 मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम उडीसह सुवर्णपदक जिंकले.

याबरोबरच, खेलो इंडिया ॲथलीट आणि पॅरालिम्पिकमध्ये पदार्पण करणारा होकाटो सेमा याने पुरुषांच्या शॉट पुट – एफ 57 स्पर्धेत 14.65 मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम थ्रोसह कांस्यपदक जिंकले. पॅरालिम्पिकच्या या आवृत्तीत पदक जिंकणारा तो 40 वर्षांचा सर्वात जास्त वयाचा भारतीय ठरला.

***

S.Patil/S.Bedekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2052848) Visitor Counter : 28