कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
लॉजिस्टिक्समध्ये वाढीसाठी मोठा वाव, या क्षेत्रासाठी 300 हून अधिक उपक्रम आणि 80 लाख कोटी रुपये राखीव', - कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरी यांचे प्रतिपादन
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने स्विगीसोबत केला सामंजस्य करार
Posted On:
07 SEP 2024 4:15PM by PIB Mumbai
विकसित भारत 2047 च्या सरकारच्या दृष्टिकोनाला अनुसरून, कौशल्य विकास आणि नवउद्योजकता मंत्रालयाने (MSDE) स्विगी सोबत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली असून 'स्विगी कौशल्य' उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे स्विगीच्या अन्नपदार्थ पोहोचवणे आणि द्रुत वाणिज्य नेटवर्कमध्ये कौशल्य आणि रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. हा उपक्रम उपाहारगृह उद्योगात काम करण्यास उत्सुक असलेल्या लोकांना आणि किरकोळ व्यवस्थापनाच्या विविध पैलूवर काम करणाऱ्या लोकांना रोजगार, अंतर्वासिता आणि प्रशिक्षणाच्या संधी आणि प्रदान करेल. स्विगी कौशल्य उपक्रमांतर्गत, स्विगी भागीदार व्यासपीठ, स्कील इंडिया डिजिटल हब (SIDH) च्या सोबतीने स्विगीच्या कर्मचाऱ्यांना ऑनलाइन कौशल्य विकास अभ्यासक्रम, प्रमाणपत्रे आणि प्रशिक्षण मॉड्यूल्स उपलब्ध करून देईल. या भागीदारीमुळे 2.4 लाख डिलिव्हरी भागीदार आणि स्विगीशी संबंधित उपहारगृह भागीदारांच्या कर्मचाऱ्यांना फायदा होईल.
“विकसित भारत @2047 हे भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यात, लॉजिस्टिक क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल”, असे या उपक्रमाच्या आणि भागीदारीच्या प्रारंभाप्रसंगी बोलताना. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (एमएसडीई) राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरी म्हणाले. ही बाब लक्षात घेऊन आमच्या सरकारने भारतात राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण अमलात आणले आहे, असेही ते म्हणाले. आम्ही या क्षेत्रातील वाढीसाठी एक सक्षम परिसंस्था देखील तयार करत आहोत जिथे कौशल्य आणि शिक्षण हातात हात घालून काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजची भागीदारी हे दाखवते की सार्वजनिक खाजगी भागीदारी या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी कशाप्रकारे नवीन मार्ग तयार करू शकतात आणि त्या मार्गांची गती वाढवू शकतात, असे त्यांनी सांगितले. या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत आणि आम्हाला या उपक्रमात आणखी कॉर्पोरेट भागीदार आमच्यासोबत आलेले पाहायचे आहेत”, असे ते म्हणाले.
स्विगी हा एक अग्रगण्य स्वदेशी आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला ब्रँड आहे, जो जवळपास 700 शहरांमध्ये कार्यरत आहे. अन्नपदार्थ पोहोचवण्याच्या सेवेतील अग्रगण्य म्हणून स्विगी फूड आणि द्रुत वाणिज्य नेटवर्क सेवेतील अग्रगण्य म्हणून स्विगी इन्स्टामार्ट यांच्याकडे डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह आणि उपहारगृह भागीदारांचे विशाल जाळे आहे.
स्विगी कौशल्य उपक्रमांतर्गत, स्विगीच्या संपूर्ण परिसंस्थेत प्रमाणन अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण मॉड्यूल प्रदान करण्यासाठी स्विगी भागीदार व्यासपीठ स्किल इंडिया डिजिटल हब (SIDH) सह समाकलित केले जाईल. यामुळे डिलिव्हरी भागीदार आणि उपहारगृह भागीदारांचे कर्मचारी ऑनलाइन कौशल्य विकास अभ्यासक्रम, प्रमाणपत्रे आणि वर्धित रोजगारक्षमतेसाठी प्रशिक्षण मॉड्यूल्समध्ये सहज प्रवेश करण्यास सक्षम बनतील. या शिवाय, कौशल्य विकास आणि नवउद्योजकता मंत्रालयाच्या (MSDE) योजना आणि कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना स्विगी त्यांच्या परिसंस्थेत नोकरीच्या विविध रुपांमध्ये सामावून घेईल. याव्यतिरिक्त, तरुणांना अंतर्वासिता संधी उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या तरुणांना नंतर स्विगीच्या द्रुत वाणिज्य कार्यात सामावून घेतले जाईल.
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2052845)
Visitor Counter : 55