गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पद्म पुरस्कार - 2025 साठी नामांकन 15 सप्टेंबर 2024 पर्यंत खुले

Posted On: 03 SEP 2024 4:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 सप्‍टेंबर 2024

 

प्रजासत्ताक दिन 2025 ला  घोषित करण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कार 2025 साठी नामांकन किंवा शिफारशी, 01 मे 2024 पासून सुरू झाल्या आहेत. पद्म पुरस्कारांसाठी नामांकनांची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन किंवा शिफारशी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर (https://awards.gov.in) केवळ ऑनलाइन सादर करता येतील.  

पद्म पुरस्कार म्हणजेच, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री, हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. 1954 मध्ये प्रारंभ झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त केली जाते.  हा पुरस्कार 'विशेष कार्याचा' सन्मान करण्यासाठी दिला जातो. कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग इ. यांसारखी सर्व क्षेत्रे आणि विषयांमध्ये विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरी किंवा सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो.  वंश, व्यवसाय, पद किंवा लिंग असा कोणताही भेद न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता सार्वजनिक उपक्रमांसोबत काम करणारे सरकारी कर्मचारी पद्म पुरस्कारांसाठी पात्र नाहीत.

पद्म पुरस्कारांचे रूपांतर “लोकांच्या पद्म” पुरस्कारांमध्ये करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.  म्हणूनच, सर्व नागरिकांनी स्वतःच्या नामांकनासह इतरांच्या नामांकन किंवा शिफारशी कराव्यात, असे आवाहन केले जात आहे.  महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती आणि जमाती, दिव्यांग व्यक्तींमधील अशा प्रतिभावान व्यक्तींची ओळख करण्यासाठी ठोस प्रयत्न करता येतील ज्यांची उत्कृष्टता आणि कार्य  वाखाणण्याजोगे  आहे आणि जे समाजाची निःस्वार्थ सेवा करत आहेत.

नामांकन किंवा शिफारशींमध्ये उपरोक्त पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नमुन्यात निर्दिष्ट केलेले सर्व संबंधित तपशील असावेत, ज्यात वर्णनात्मक स्वरूपात (जास्तीत जास्त 800 शब्द) त्या व्यक्ती संदर्भात उद्धरण समाविष्ट आहे. या उद्धरणात शिफारस केलेल्या व्यक्तीची संबंधित क्षेत्रात विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरी किंवा सेवा स्पष्ट होणे आवश्यक आहे. 

या संदर्भातील तपशील गृह मंत्रालयाच्या (https://mha.gov.in) या संकेतस्थळावर आणि पद्म पुरस्कार पोर्टलवर (https://padmaawards.gov.in) 'पुरस्कार आणि पदके' या शीर्षकाखाली देखील उपलब्ध आहेत.  या पुरस्कारांशी संबंधित कायदे आणि नियम पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत : https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2051328) Visitor Counter : 91