संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

एचएएल कडून भारतीय वायू दलाच्या Su-30 MKI विमानांसाठी सुमारे 26,000 कोटी रुपये खर्चून 240 एरो-इंजिन खरेदी करण्यास सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने दिली मंजुरी

Posted On: 02 SEP 2024 9:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 सप्‍टेंबर 2024

 

सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने, 2 सप्टेंबर 2024 रोजी, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून (HAL) खरेदी (भारतीय) श्रेणी अंतर्गत भारतीय हवाई दलाच्या (IAF) Su-30 MKI विमानांसाठी, सर्व कर आणि शुल्कांसहित 26,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाची  240 एरो-इंजिन (AL-31FP) खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या एरो-इंजिनचा पुरवठा एक वर्षानंतर सुरू होईल आणि आठ वर्षांच्या कालावधीत पूर्ण होईल.

एरो-इंजिनच्या काही प्रमुख घटकांच्या स्वदेशीकरणामुळे इंजिनांमध्ये 54% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्री असेल.  हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कोरापुट विभागात या  एरो-इंजिनचे उत्पादन केले जाईल.

Su-30 MKI हे  भारतीय वायू दलाच्या सर्वात शक्तिशाली आणि सामरिकदृष्ट्या-महत्त्वाच्या ताफ्यातील एक विमान आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे या एरो-इंजिनांचा पुरवठा भारतीय वायू दलाला आपल्या मोहीमा विनाअडथळा  सुरू ठेवण्यासाठी तसेच देशाच्या संरक्षण सज्जतेला बळकट करण्यासाठी त्यांच्या ताफ्याच्या निर्वाहाची आवश्यकता पूर्ण करेल.

 

* * *

S.Kane/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2051078) Visitor Counter : 61