ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘नॅशनल हायड्रोइलेक्ट्रीक पावर लिमिटेड’ला नवरत्न’ कंपनीचा दर्जा बहाल

Posted On: 31 AUG 2024 12:50PM by PIB Mumbai

 

भारत सरकारने नॅशनल हायड्रोइलेक्ट्रीक पावर लिमिटेड’ - एनएचपीसीला  ‘नवरत्न’ कंपनीचा प्रतिष्ठित दर्जा बहाल केला आहे. वित्त मंत्रालयाच्या सार्वजनिक उपक्रम विभागाने 30-08-2024  रोजीच्या आदेशानुसार, एनएचपीसीला  ही ‘नवरत्न कंपनी’ म्हणून घोषित करण्यात आली आहे, ज्यामुळे एनएचपीसीला परिचालन आणि आर्थिक बाबींसाठी आणखी स्वायत्तता मिळेल.

एनएचपीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक श्री. आर. के. चौधरी, म्हणाले, "हा  एनएचपीसीच्या कुटुंबासाठी खरोखरच एक ऐतिहासिक क्षण आहे, आणि आमच्या उल्लेखनीय आर्थिक आणि परिचालन कामगिरीची ही ओळख आहे."  भारत सरकारने एनएचपीसीला नवरत्न दर्जा बहाल केल्याबद्दल तसेच एनएचपीसीवर मंत्रालयाने दाखवलेल्या अतूट विश्वासाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल एनएचपीसी उद्योगाच्या वतीने त्यांनी ऊर्जा मंत्रालयाचे आभार मानले. चौधरी म्हणाले की, “एनएचपीसी भारतीय ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका निभावत असून  देशाच्या जलविद्युत क्षमतेचा उपयोग करण्यातही ठोस भूमिका बजावत आहे. पवन आणि सौर ऊर्जा पर्यायांमध्येही आम्ही विविधता आणली असून, आम्ही एक संपूर्ण हरित ऊर्जा कंपनी आहोत, असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.         

नवरत्न दर्जा बहाल केल्याने एनएचपीसीला अनेक महत्त्वाचे लाभ मिळाले आहेत. यामुळे एनएचपीसीला जलद निर्णय घेणे‌ सहजशक्य होईल, कार्यक्षमता वाढेल आणि कर्मचारी अधिक सक्षम होतील. तसेच हे प्रमुख कॅपेक्स  (CAPEX) आणि गुंतवणूक योजनांसाठी सहायक ठरेल, विकासाला चालना  मिळेल, बाजारपेठेचा विस्तार होईल तसेच यामुळे दीर्घकालीन नफ्यात वृध्दी होईल. एनएचपीसीला संयुक्त उपक्रम राबविण्यास आणि परदेशात कार्यालये स्थापन करण्यासाठी, नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यास आणि स्थानिक कौशल्याचा लाभ घेण्यास जास्त अधिकार मिळतील. याशिवाय, एनएचपीसीला तंत्रज्ञानात आघाडी घेऊन आणि बाजारपेठेतील स्थिती मजबूत करून नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन देता येईल. यामुळे विलीनीकरण आणि अधिग्रहण प्रक्रिया सुद्धा सुलभ होतील ज्यामुळे विकासाच्या दिशेने वाटचाल करतानाच बाजारपेठेतील हिस्साही वाढेल.

सध्या, एनएचपीसीची एकूण स्थापित क्षमता 7144.20 मेगावॉट (MW) आहे आणि कंपनी सध्या एकूण 10442.70 MW प्रकल्पांच्या बांधकामात गुंतलेली आहे.  यामध्ये 2000 MW सुबनसिरी निम्न प्रकल्प (आसाम/अरुणाचल प्रदेश) आणि 2880 MW दिबांग बहुउद्देशीय प्रकल्प (अरुणाचल प्रदेश) यांचा समावेश आहे.  सध्या एनएचपीसी 50000 MW पेक्षा जास्त क्षमतेच्या प्रकल्पांवर काम करत आहे, जे विकासाच्या विविध टप्प्यांत आहेत. 2032 सालापर्यंत एनएचपीसी 23000 मेगावॅट आणि 2047 सालापर्यंत 50000 मेगावॅटची स्थापित क्षमता साध्य करण्याच्या दृष्टीने सातत्याने काम करत आहे.

***

M.Pange/S.Patgaonkar/P.Kor

O

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2050403) Visitor Counter : 103