संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मेम्फिस येथील राष्ट्रीय नागरी हक्क संग्रहालयाला दिली भेट
राजनाथ सिंह यांनी आपल्या अमेरिका दौऱ्याची भारतीय समुदायाशी संवाद साधून केली सांगता
भारतीय समुदाय हा भारत आणि अमेरिकेतील वाढते संबंध आणि सौहार्द सांधणारा सेतू-राजनाथ सिंह
Posted On:
26 AUG 2024 9:58AM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या अमेरिका दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी 25 ऑगस्ट, 2024 रोजी, मेम्फिस येथे राष्ट्रीय नागरी हक्क संग्रहालयाला भेट दिली आणि भारतीय समुदायाशी संवाद साधला. अमेरिकेतील 17व्या शतकापासून ते आतापर्यंतचा नागरी हक्क चळवळीचा इतिहास राष्ट्रीय नागरी हक्क संग्रहालयामध्ये मांडण्यात आला आहे. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांची वर्ष 1968 मध्ये ज्या ठिकाणी हत्या झाली होती, त्याभोवती हे संग्रहालय बांधण्यात आले आहे. अहिंसात्मक संघर्षासाठी प्रेरणा देणाऱ्या महात्मा गांधी यांचा अर्धाकृती पुतळाही या ठिकाणी आहे.
मेम्फिस, अटलांटा, नॅशविल आणि आसपासच्या परिसरातील भारतीय समुदायाशी संवाद साधताना, राजनाथ सिंह यांनी भारतीय समुदायाच्या कामगिरीचे, समाज, विज्ञान आणि अर्थव्यवस्थेत ते देत असलेल्या योगदानाचे कौतुक केले. भारतीय समुदाय हा भारत आणि अमेरिका यांच्यातील वाढते संबंध आणि सौहार्द सांधणारा 'जिवंत सेतू ' असल्याचे सिंह यांनी यावेळी सांगितले.
महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त वर्ष 2019 मध्ये राष्ट्रीय नागरी हक्क संग्रहालयाजवळ महात्मा गांधींच्या जीवनावरील प्रदर्शन उभारण्यातआणि सिग्नलजवळ दोन मार्गांचे सन्मानाचे 'गांधी वे' म्हणून नामकरण करण्यासाठी भारतीय समुदायाने केलेल्या प्रयत्नांचे संरक्षण मंत्री सिंह यांनी कौतुक केले. अमेरिका दौऱ्याच्या आपल्या या शेवटच्या कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी गेल्या दशकभरातील भारताची विकासगाथा आणि आश्वासक भविष्यासह अमाप क्षमता याकडे लक्ष वेधले.
***
JPS/SonaliK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2048848)
Visitor Counter : 77