उपराष्ट्रपती कार्यालय

जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 25 AUG 2024 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्ट 2024

 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.  त्यांच्या संदेशाचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे आहे:

"जन्माष्टमीच्या पावन प्रसंगी मी सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा देतो.

दैवी प्रेम, ज्ञान आणि कर्तव्यपरायणता या गुणांचे मूर्त स्वरूप असणाऱ्या भगवान कृष्णाच्या जन्माचे प्रतीक असणारा जन्माष्टमी हा आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.

हा सण धर्माच्या शाश्वत मूल्यांची आठवण करून देणारा, वाईटावर चांगल्याचा विजय तसेच सत्य आणि करुणेच्या मार्गाने जीवन जगण्याचे महत्त्व सांगणारा दिवस आहे. हा पवित्र दिवस साजरा करत असताना, आपण भगवान कृष्णाच्या कालातीत उपदेशाचे चिंतन करूया तसेच आपल्या समाजात एकता, शांतता आणि सौहार्द वाढवून जगण्याचा प्रयत्न करूया.

या दिव्य प्रसंगी आपण सन्मार्गाचा अवलंब करून सर्वांच्या कल्याणासाठी कार्य करण्याची शपथ घेऊया.

जय श्री कृष्ण!"

उपराष्‍ट्रपतींच्‍या संदेशच्‍या इंग्रजी आणि हिंदी अनुवादासाठी येथे क्लिक करा

 

* * *

S.Patil/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2048740) Visitor Counter : 9


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil