संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिकेतील संरक्षण कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी साधला संवाद

Posted On: 24 AUG 2024 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 ऑगस्ट 2024

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वॉशिंग्टन डीसी येथे 23 ऑगस्ट 2024 रोजी अमेरिका भारत धोरणात्मक भागिदारी मंचाद्वारे आयोजित उद्योग गोलमेज बैठकीत अमेरिकेतील संरक्षण कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. संरक्षणमंत्र्यांनी या बैठकीत, भारतातील संरक्षण क्षेत्रातील विविध सह-विकास आणि सह-उत्पादन संधींचा आराखडा सादर केला. भारत सरकारने हाती घेतलेल्या प्रगतीशील सुधारणांमुळे परदेशातील अनेक उपकरण उत्पादकांना भारतात उत्पादन एकके स्थापना करण्यासाठी, संयुक्त उपक्रम विकसित करण्यासाठी आणि भारताला त्यांचा पर्यायी निर्यात आधार बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. यामध्ये अमेरिकेतील उत्पादकांचा देखील समावेश आहे. भारतामध्ये GE 414 एरो-इंजिनचे नियोजित सह-उत्पादन हा भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांमध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल.

'भागीदारी' आणि 'संयुक्त प्रयत्न' हे असे दोन महत्वाचे शब्द आहेत, जे संरक्षण उद्योग भागीदारीमधील भारताचे वेगळेपण स्पष्ट करतात, असे राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले.

या कार्यक्रमात अमेरिकेतील बोईंग, जीई, जनरल ॲटॉमिक्स, जनरल डायनॅमिक्स लँड सिस्टीम्स, एल 3 हॅरिस, लॉकहीड मार्टिन, रेथिऑन टेक्नॉलॉजीज, रोल्स रॉयस आणि थायरमहान अशा संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  याशिवाय, आयडियाफोर्ज, टाटा सन्स आणि टीसेकंड सारख्या काही भारतीय कंपन्या, आणि द कोहेन ग्रुपचे वरिष्ठ अधिकारीही संरक्षणमंत्र्यांसोबत या संवादात सहभागी झाले.  या संवादादरम्यान, व्यवसाय प्रमुखांनी भारतासाठी त्यांच्या सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांचा तसेच भविष्यातील योजनांचा संक्षिप्त आराखडा तयार केला आणि मौल्यवान अभिप्राय दिला. 

 

* * *

M.Pange/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2048592) Visitor Counter : 41