पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडच्या अध्यक्षांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
22 AUG 2024 8:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडचे अध्यक्ष आंद्रेज सेबॅस्टियन डुडा यांची आज वॉर्सा येथील बेलवेडर राजप्रासादामध्ये भेट घेतली.
उभय नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. भारत-पोलंड संबंध आता धोरणात्मक भागीदारीमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत, त्याचे त्यांनी स्वागत केले. युक्रेन आणि पश्चिम आशियातील संघर्षांसह प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
‘ऑपरेशन गंगा’ दरम्यान युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पोलंडने वेळेवर अमूल्य मदत केल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली.
राष्ट्रपती डुडा यांना दिलेल्या भारतभेटीच्या निमंत्रणाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला.
* * *
S.Kane/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2047837)
आगंतुक पटल : 89
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam