ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्ट रोजी 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र प्रदान करणार आणि त्यांच्याशी संवाद साधणार : कृ‍षी मंत्री शिवराज सिंह चौहान

Posted On: 22 AUG 2024 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑगस्ट 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील जळगाव येथे 25 ऑगस्ट रोजी 11 लाख लखपती दीदींना  प्रमाणपत्र  देवून  त्यांच्याशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री  शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली येथे  दिली. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या या कार्यक्रमासंदर्भात शिवराजसिंह चौहान यांनी आज पत्रकार परिषद घेतली.  यावेळी केंद्रीय राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानीही उपस्थित होते. कृषी मंत्री चौहान यांनी सांगितले की, पंतप्रधान  नरेंद्र मोदी लखपती दीदींशी संवाद साधतील आणि नवीन 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रही देतील. या कार्यक्रमात पंतप्रधान 2500 कोटी रुपयांचा ‘सामुदायिक गुंतवणूक निधी’  हा  पुनरावर्ती निधी  जारी करणार आहेत.   

या निधीचा 4.3 लाख बचत गटांच्या सुमारे 48 लाख सदस्यांना लाभ होईल. पंतप्रधान 5000 कोटी रुपयांचे बँक कर्ज देखील जारी करणार आहेत. त्यामुळे 2,35,400 बचत गटांच्या 25.8 लाख सदस्यांना फायदा होईल. यावेळी  चौहान यांनी  सांगितले की,  34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील राज्यांच्या राजधानीत सुमारे 30,000 ठिकाणांचे जिल्हा मुख्यालये आणि सीएलएफ दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्‍ये  सहभागी होणार आहेत.

ज्या महिला वार्षिक 1 लाख रुपये किंवा त्याहून अधिक कमावतात, त्या लखपती दीदी आहेत, असे सांगून  शिवराज सिंह चौहान म्हणाले की, या लखपती दीदींनी केवळ आपल्या कुटुंबांना गरीबीतून बाहेर काढले नाही तर त्या समाजातील इतरांसाठी आदर्श बनत आहेत.  चौहान यांनी सांगितले की, ग्रामीण विकास मंत्रालयाने यापूर्वीच 1 कोटी लखपती दीदी तयार केल्या आहेत. आता आमचे लक्ष्य पुढील 3 वर्षांत 3 कोटी लखपती दीदी तयार करण्याचे आहे. यापैकी एका सीआरपीने 95 लखपती दीदी तयार केल्या आहेत,  ही गोष्‍ट आनंददायक असल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, मंत्रालयाने बचत गटांच्या  कुटुंबांना 1 लाख किंवा त्याहून अधिक वार्षिक उत्पन्न मिळविण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी एक संरचित प्रक्रिया स्वीकारली आहे.

List of 15 lakh New Lakhpati Didis’ (State wise)

Sr.

Name of States/ UTs

Target no. of SHG members

Sr.

Name of States/ UTs

Target no. of SHG members

1

Andaman & Nicobar Islands

240

18

Madhya Pradesh

96,240

2

Andhra Pradesh

1,22,160

19

Maharashtra

1,04,520

3

Arunachal Pradesh

1260

20

Manipur

3,060

4

Assam

52,800

21

Meghalaya

6,120

5

Bihar

1,81,260

22

Mizoram

1,080

6

Chhattisgarh

46,920

23

Nagaland

1,800

7

Dadra & Nagar Haveli

180660

24

Odisha

97,200

8

Goa

44,580

25

Puducherry

660

9

Gujarat

10,740

26

Punjab

9,660

10

Haryana

4,980

27

Rajasthan

67,620

11

Himachal Pradesh

13,980

28

Sikkim

840

12

Jammu & Kashmir

13,980

29

Tamil Nadu

54,000

13

Jharkhand

50,640

30

Telangana

67,500

14

Karnataka

47,580

31

Tripura

6,780

15

Kerala

53,580

32

Uttar Pradesh

1,73,520

16

Ladakh

180

33

Uttarakhand

7,200

17

Lakshadweep

60

34

West Bengal

1,70,400

Total

15,00,000

 

* * *

S.Kane/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2047773) Visitor Counter : 62