वस्त्रोद्योग मंत्रालय

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी वस्त्रोद्योग क्षेत्रासाठीच्या उत्पादनाशी संलग्‍न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद

Posted On: 20 AUG 2024 9:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2024

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे एमएमएफ,अर्थात मानव निर्मित धाग्यांपासून बनवलेली वस्त्रे,कपडा तसेच तांत्रिक म्हणजेच औद्योगिक वापराच्या कापडासाठी असलेल्या उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी सहभागींनी योजनांची वचनबद्धता, यश, अनुभव, अभिप्राय आणि आव्हाने याबद्दल विचार मांडले.

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी आश्वासन दिले की, सरकार वस्त्रोद्योग क्षेत्राचा विकास आणि नवोन्मेश, याला पाठबळ देण्यासाठी वचनबद्ध आहे.या योजनेचा प्रभाव आणखी वाढवण्यासाठी भविष्यातील धोरणे आणि सुधारणांवरही यावेळी चर्चा झाली. सहभागींना मंत्रालयाचे कायम सहकार्य मिळेल असे आश्वासन देत, त्यांनी आपल्या गुंतवणुकीला गती द्यावी असे आवाहन केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केले. या क्षेत्रासाठीचा दृष्टीकोन प्रत्यक्षात साकारण्यासाठी आपले विचार आणि सूचना मांडण्याची संधी दिल्याबद्दल,लाभार्थी कंपन्यांनी केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानले.

S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2047100) Visitor Counter : 28