आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा यांनी नवी दिल्ली येथे ‘फर्स्ट पॉलिसी मेकर्स फोरम’चे केले उद्घाटन


आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने भारतीय फार्माकोपोइया आयोगाने आयोजित केलेल्या मंचामध्‍ये 15 देशांतील धोरणकर्ते आणि औषध नियामकांच्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाचा सहभाग

Posted On: 19 AUG 2024 9:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑगस्ट 2024

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री,  जेपी नड्डा यांनी आज नवी दिल्ली येथे 'फर्स्ट पॉलिसी मेकर्स फोरम' चे उद्घाटन केले, या फाेरमचा कार्यक्रम 22 ऑगस्ट 2024 पर्यंत चालणार आहे. फार्मास्युटिकल क्षेत्रामध्‍ये भारताचे जागतिक स्थान उन्नत करण्यासाठी, भारतीय फार्माकोपोइया आयोग (आयपीसी), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने, 15 देशांतील धोरणकर्ते आणि औषध नियामकांच्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाच्या चर्चेचे आयोजन केले आहे. 

या फोरममध्ये फार्माकोपोइया आणि औषध सुरक्षा देखरेखीसाठी अभिनव डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेल्या नव्या डिजिटल मंचाचा प्रारंभ यावेळी झाला. इंडियन फार्माकोपोइया (आयपी) ची जागतिक मान्यता वाढवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला अधोरेखित करण्यासाठी, फोरममध्ये बुर्किना फासो, इक्वेटोरियल गिनी, घाना, गयाना, जमैका, लाओ पीडीआर, लेबनॉन, मलावी, मोझांबिक, नाउरू, निकारगुआ, श्रीलंका, सीरिया, युगांडा आणि झांबिया यासह विविध देशांचा सहभाग या फोरममध्‍ये आहे. आयपी मान्यता आणि जनऔषधी योजना म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारताच्या प्रमुख प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजने (पीएमबीजेपी) च्या अंमलबजावणीविषयी अर्थपूर्ण चर्चा घडवून आणणे हे फोरमचे उद्दिष्ट आहे.

  

कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या औषध नियामक प्राधिकरणांचे प्रतिनिधी आणि लॅटिन अमेरिकन, आफ्रिकन, आग्नेय आशियाई आणि पॅसिफिक प्रदेशातील आरोग्य मंत्रालयांच्या प्रतिनिधींचे स्वागत करताना, जे पी नड्डा म्हणाले की “या मंचाच्या माध्‍यमातून  सुरक्षा, परिणामकारकता, यावर विचारांची देवाणघेवाण करण्याची उत्कृष्ट संधी मिळू शकेल. तसेच रुग्णांच्या फायद्यासाठी आम्ही सर्वोच्च मानकांचे पालन करीत आहोत, याची खात्री दिली जाते. त्यामुळे सहभागी देशांमधील वैद्यकीय फार्मास्युटिकल उत्पादनांची गुणवत्ता निश्चित केली जाईल.” ते पुढे म्हणाले की, “भारताची ओळख ‘जगातील फार्मसी’ अशी आहे. आम्हाला अभिमान आहे की, आमची जेनेरिक औषधे मलेरिया, एचआयव्ही-एड्स आणि क्षयरोग यांसारख्या आजारांवर उपचार करण्यास मदत करतात.  या आजारांना सामान्यतः विकसनशील देशांच्या आरोग्य समस्या मानल्या जातात.” या रोगांच्या निर्मूलनासाठी भारताच्या वचनबद्धतेवर जोर देऊन नड्डा यांनी  भारताचे हे योगदान अधोरेखित केले. 

  

जागतिक आरोग्याविषयी भारताची वचनबद्धता आणि विकसनशील राष्ट्रांमधील आरोग्यसेवेतील दरी भरून काढण्याची जबाबदारीही  त्यांनी अधोरेखित केली.  "एचआयव्ही-एड्ससाठी औषधे देणे खूप महाग असल्याने ती  विकसनशील राष्ट्रांसाठी मोठा भार ठरले होते, मात्र यासाठी  भारतीय उत्पादक पुढे आले आणि प्रभावी व  परवडणारी औषधे प्रदान करण्यात पुढाकार घेतला".

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांच्याद्वारे दोन महत्त्वपूर्ण डिजिटल मंच  -आयपी  ऑनलाइन पोर्टल आणि ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन मॉनिटरिंग सिस्टम (एडीआरएमएस) सॉफ्टवेअर यांचा प्रारंभ आज करण्‍यात आला. हे भारतीय फार्माकोपोइयाचे डिजिटलीकरण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे, ज्यामुळे जगभरातील भागधारकांसाठी औषध मानके अधिक सुलभ होतील.

एडीआरएमएस सॉफ्टवेअर, भारताच्या ‘फार्माकोव्हिजिलन्स’ कार्यक्रमाचा भाग म्हणून विकसित केले गेले आहे, हे भारतातील पहिले स्वदेशी वैद्यकीय उत्पादन सुरक्षा डेटाबेस आहे, जे भारतीय लोकसंख्येच्या गरजेनुसार तयार केले गेले आहे.

 

* * *

S.Kakade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2046774) Visitor Counter : 44