निती आयोग
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या राईज अॅक्सलरेटर या उपक्रमाअंतर्गत कृषी तंत्रनाविषयक वातावरणाकुल स्मार्ट पथक स्थापन करण्यासाठी स्टार्ट अप आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अर्ज भरण्याचे निमंत्रण
Posted On:
19 AUG 2024 12:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2024
अटल इनोव्हेशन मिशन आणि ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्था यांनी (Commonwealth Scientific and Industrial Research Organisation - CSIRO) भागिदारीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियातील कृषी क्षेत्राशी संबंधित स्ट्रार्ट्स अप्स आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकडून अर्ज मागवले आहे. हे अर्ज भारत आणि ऑस्ट्रेलियाकरता कृषी तंत्रनाविषयक वातावरणाकुल स्मार्ट पथक स्थापन करण्यासाठी मागवले गेले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियाद्वारे परस्परांच्या उद्योगांना पाठबळ देत दोन्ही देशांना आंतरराष्ट्रीय व्यापार विस्तारात मदत व्हावी या उद्देशाने, दोन्ही देशांद्वारे संयुक्तपणे रॅपिड इनोव्हेशन अँड स्टार्ट-अप एक्सटेंशन (RISE) हा कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमाअंतर्गतच स्ट्रार्ट्स अप्स आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकडून हे अर्ज मागवले आहेत. हे प्रस्तावित पथक भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांसमोर कृषी क्षेत्राशी संबंधित ज्या सर्वात महत्त्वाच्या आणि एकसामायिक समस्या आहेत, त्यांचा सामना करण्याच्यादृष्टीने अधिक नवोन्मेषी उपाययोजना राबवण्यात महत्वाचे ठरणार असल्याने हा उपक्रम मैलाचा दगड ठरला आहे.
राईज अॅक्सलरेटर हा उपक्रम प्रत्यक्षात 2024 च्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे. या उपक्रमाअंतर्गत स्टार्ट अप्स तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर अधिक भर दिला जाईल. याअंतर्गत सातत्याने बदलत्या हवामान्याच्या परिस्थितीशी जुळवून घेत कृषी उत्पादन वाढवणे, अन्नधानाच्या तुटवड्यावर तसेच अन्न असुरक्षिततेच्या समस्येवर मात करणे यादृष्टीने तंत्रज्ञान विकसित करणे आणि उपाययोजनांची आखणी करण्यावर भर दिला जाणार आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांची गरज आणि त्यांच्या प्राधन्यक्रम, तसेच प्रत्यक्ष कृषी प्रक्रियेला केंद्रस्थानी ठेवून काम करणारे स्टार्ट अप्स तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, आणि त्यादृष्टीने आखल्या गेलेल्या उपाययोजनांचाच विचार केला जाणार आहे.
या उपक्रमाच्या निवड प्रक्रियेअंतर्गतच आयोजित केलेल्या आगामी फेरीत भाग घेणाऱ्यांकडून कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवणे, कार्बन उत्सर्जनात घट साध्य करणे आणि नैसर्गिक संसाधनांचा सर्वोत्तम पुरेपूर वापर करून घेणे या बाबींशी संबंधित कृषी क्षेत्रासमोरील जी खडतर आव्हाने आहेत, त्यावर शाश्वत उपाययोजना मांडल्या जाव्यात अशी अपेक्षा बाळगली गेली आहे.
राइज एक्सलरेटर या उपक्रमाअंतर्गत नोंदणीसाठी 15 सप्टेंबर 2024 पर्यंतच अर्ज दाखल करता येणार आहेत.
अर्ज दाखल करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी कृपया https://riseaccelerator.org/ या दुव्याला भेट द्या.
* * *
S.Tupe/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2046538)
Visitor Counter : 56