राष्ट्रपती कार्यालय

रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 18 AUG 2024 7:47PM by PIB Mumbai

 

रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे : -

रक्षाबंधनाच्या या शुभ प्रसंगी मी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देत आहे.

रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणींच्या एका आगळ्यावेगळ्या बंधाचा उत्सव आहे जो प्रेमभावना आणि परस्पर विश्वासाच्या भावनेला बळकट करतो. धार्मिक आणि सांस्कृतिक सीमांच्या पलीकडे जाऊन आपल्या देशाच्या विविधतेतील एकतेचे प्रतीक दर्शवणारा हा सण आहे. महिलांच्या अधिकारांचे रक्षण करण्याचा आपला निर्धार बळकट करणारा हा सण आहे.

हा सण सौहार्द आणि प्रेमभावनेची जोपासना करू दे आणि महिलांविषयीचा आदर वृद्धिंगत करू दे.”

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी येथे क्लिक करा -

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2046467) Visitor Counter : 17


Read this release in: English , Urdu , Hindi