उपराष्ट्रपती कार्यालय
भारताला अस्थिर करण्यासाठीच्या आणि देशाच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठीच्या कुटील डावाबाबत सतर्क राहण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
‘हर घर तिरंगा’ मोहिमेने नागरिकांमध्ये राष्ट्रीय अभिमान जागृत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन
Posted On:
13 AUG 2024 10:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2024
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नागरिकांना "भारताला अस्थिर करणे आणि आपल्या प्रगतीला बाधा आणणे हे एकमेव उद्दिष्ट आहे, अशा कुटील डावाबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले."
आज भारत मंडपम येथून हर घर तिरंगा बाइक रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यापूर्वी नागरिकांना संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले, “काही लोकांना आपल्या विकासाचा वेग पचवता येत नाही. त्यांना अडथळे निर्माण करायचे आहेत, अस्थिरता आणायची आहे.”
तिरंगा ध्वजाचे प्रतीकात्मक महत्त्व ओळखून नागरिकांनी विरोधी शक्तींविरुद्ध संघटित होण्यासाठी यातून प्रेरणा घेण्याचे त्यांनी आवाहन केले आणि प्रत्येक परिस्थितीत राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी सर्व देशवासियांना केले.
या मोहिमेचे आज ‘लोकचळवळीत’ रूपांतर झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारताची शान असलेल्या तिरंगा ध्वजाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत उपराष्ट्रपतींनी तिरंगा हा केवळ ध्वज नसून आपल्या सार्वभौमत्वाचे आणि सामूहिक अस्मितेचे प्रतीक आहे यावर भर दिला.
जागतिक स्तरावर भारताचा परिवर्तनशील प्रवास आणि शांतता आणि प्रगतीसाठीची अटल वचनबद्धता यावर प्रकाश टाकत धनखड यांनी नमूद केले की विदेशी संस्था आता देशाची वेगवान आर्थिक वाढ आणि जागतिक प्रभाव प्रतिबिंबित करणारे एक उज्वल उदाहरण म्हणून भारताकडे पाहतात.
संपूर्ण भाषणासाठी येथे क्लिक करा: https://pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=2044745
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2045037)
Visitor Counter : 73