सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘हर घर तिरंगा’ अभियान 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान होणार साजरे


सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या अभियानात सक्रिय सहभागी होत असल्याने अभियानाचे यश सुनिश्चित : गजेंद्र सिंह शेखावत

Posted On: 08 AUG 2024 9:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2024

स्वातंत्र्य दिन समारंभाचा एक भाग म्हणून तिसरे  "हर घर तिरंगा" (एचजीटी )अभियान 9 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत साजरे केले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केली. ते आज नवी दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. प्रत्येक भारतीयाला राष्ट्रध्वज,तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करून नागरिकांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्राभिमानाची भावना जागृत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असे त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. नागरिकांनी घरोघरी तिरंगा फडकवावा आणि राष्ट्रध्वजासह सेल्फी काढून तो harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावा,असे आवाहन शेखावत यांनी केले.

2022 मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेली "हर घर तिरंगा" मोहीम देशभरातल्या समाजातील विविध घटकांनी स्वीकारलेली लोकचळवळ बनली आहे, असेही शेखावत म्हणाले. 2022 मध्ये, 23 कोटींहून अधिक घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आणि 6 कोटी लोकांनी harghartiranga.com या संकेतस्थळावर ध्वजासह त्यांचे सेल्फी अपलोड केले. 2023 मध्ये, "हर घर तिरंगा” मोहिमेअंतर्गत 10 कोटींहून अधिक सेल्फी अपलोड करण्यात आले.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या उत्सवात सक्रियपणे सहभागी होत आहेत त्यामुळे या मोहिमेचे यश सुनिश्चित आहे,अशी माहिती मंत्र्यांनी दिली.या मोहिमेबाबतची माहिती प्रसारित करण्यात आणि मोहिमेचा प्रचार करण्यात प्रमुख उद्योग भागीदार- ई-कॉमर्स व्यासपीठ, रेल्वे, नागरी विमान वाहतूक क्षेत्र,भारतीय सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल देखील सक्रिय भूमिका बजावत आहेत.देशभरातील स्वयं-सहायता गट मोठ्या प्रमाणात ध्वज निर्मिती आणि ध्वज उपलब्धतेसाठी सक्रिय योगदान देत आहेत.हा सहयोगी प्रयत्न राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याच्या दृष्टीकोनाला मूर्त स्वरूप देत आहे तसेच भारतीय नागरिकांचा, भारतीय नागरिकांकडून स्वातंत्र्य उत्सवाचा आनंदोत्सव साजरा करण्याचा आणखी एक महत्वपूर्ण सोहळा आहे,असेही ते म्हणाले.

याबाबत अधिक माहिती देताना शेखावत यांनी सांगितले की, हर घर तिरंगा उत्सवाचा एक भाग म्हणून देशभरात विविध संपर्क उपक्रमांचे आयोजन केले जात आहे, त्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • तिरंगा रन: देशभक्ती वृद्धिंगत करण्यासाठी देशभरातील विविध शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
  • तिरंगा संगीत कार्यक्रम : आपला राष्ट्रीय वारसा साजरा करण्यासाठी देशभक्तीपर गाणी सादर करणारे संगीतमय कार्यक्रम.
  • पथनाट्ये (नुक्कड नाटक): एकता आणि देशभक्तीचा संदेश देण्यासाठी स्थानिक समुदायांसमोर सादरीकरण.
  • चित्रकला स्पर्धा: तरुणांना आणि मुलांना देशभक्तीच्या  कलात्मक अभिव्यक्तीमध्ये सहभागी करून घेणारा उपक्रम.
  • तिरंगा ध्वजाच्या माहिती संदर्भात प्रदर्शने :राष्ट्रध्वजाचा इतिहास आणि महत्त्व दर्शवणारे प्रदर्शन.
  • फ्लॅश मॉब्स: सार्वजनिक ठिकाणी राष्ट्राभिमानाचे उत्साही प्रदर्शन.

तिरंगा बाइक रॅली

13 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता दिल्लीत होणारी संसद सदस्यांची खास तिरंगा बाइक रॅली हे या मोहिमेचे वैशिष्ट्य आहे. ही रॅली भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथून सुरू होईल आणि इंडिया गेटमार्गे मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे रॅलीची सांगता होईल.

https://video.twimg.com/ext_tw_video/1821513378604384256/pu/vid/avc1/522x270/-df8ehypglCqKs3Z.mp4?tag=12

मन की बात या कार्यक्रमाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 28 जुलै 2024 रोजीच्या भागात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांना घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आणि गेली दोन वर्षे मोठ्या प्रमाणात लोकसहभाग दिसून आलेल्या 'हर घर तिरंगा' ची परंपरा सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

https://drive.google.com/file/d/10hbJ-LDm0ZQ0D9G0AWv1LTj1mDTqO-O9/view?usp=sharing

तिरंगा ध्वजाची  माहिती :

https://drive.google.com/file/d/1UrDUw_KuHZ7NoLRVhtaRLSBtukE6M3SM/view?usp=drive_link

अधिक माहितीसाठी, कृपया harghartiranga.com या संकेतस्थळाला भेट द्या.


N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2043384) Visitor Counter : 168