रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

वाहने भंगारात काढण्याचे धोरण (व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी), 2021

Posted On: 08 AUG 2024 2:41PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2024


वाहने भंगारात काढण्याच्या धोरणांतर्गत, वाहन मालकांना जुनी, अयोग्य आणि प्रदूषण करणारी (एंड ऑफ लाइफ व्हेइकल्स) वाहने भंगारात काढण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) 5 ऑक्टोबर 2021 रोजी GSR 720 (E) जारी केला आहे, ज्यामुळे मोटार वाहन करात बिगर मालवाहतूक वाहनांना 25% पर्यंत आणि 'सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट'नुसार खरेदी केलेल्या मालवाहतूक वाहनांना 15% पर्यंत सूट दिली जाईल. दिनांक 04 ऑक्टोबर 2021च्या GSR 714(E) नुसार, जर वाहनाची नोंदणी ‘सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट’ सादर करून झाली असेल,तर नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यासाठी शुल्क आकारले जाणार नाही.  

23 सप्टेंबर 2021 च्या GSR 653(E)(वेळोवेळी सुधारित केल्यानुसार) द्वारे जारी केलेला मोटार वाहन (वाहन स्क्रॅपिंग सुविधेची नोंदणी आणि कार्ये) नियम, 2021 हा नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा (RVSFs) स्थापित करण्यासाठी नियम प्रदान करतो. उपरोक्त नियमांपैकी नियम 10 च्या उप-नियम (xix) मध्ये अशी तरतूद आहे की,नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा (आरव्हीएसएफ) ने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) एंड-ऑफ-लाइफ व्हेइकल्स आणि AIS-129 च्या पर्यावरणीयदृष्ट्या योग्य व्यवस्थापनासाठी, जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्क्रॅप केलेल्या वाहनाचे धोकादायक भाग काढून टाकणे किंवा पुन्हा वापरात आणणे किंवा त्याची विल्हेवाट लावणे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. या नियमांपैकी नियम 14 नुसार,नोंदणीकृत स्क्रॅपरने केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 126 अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही एजन्सीद्वारे वार्षिक नियामक आणि अनुपालन लेखापरीक्षण आणि 'आरव्हीएसएफ'च्या मास फ्लो स्टेटमेंटचे लेखापरीक्षण करणे आवश्यक आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ने मार्च, 2023 मध्ये एंड-ऑफ-लाइफ वाहनांची हाताळणी आणि स्क्रॅपिंगसाठी पर्यावरणास अनुकूल सुविधांसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रकाशित केली आहेत.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने दिनांक 30 जानेवारी 2024 च्या S.O 367(E)द्वारे एंड-ऑफ-लाइफ व्हेइकल्स (व्यवस्थापन)नियम, 2024 अधिसूचित केले आहेत.हे नियम विस्तारित निर्माता जबाबदारी (ईपीआर) ची चौकट प्रदान करतात ज्यात वाहनांचे उत्पादक (आयातदारांसह) आरव्हीएसएफ मधील एंड-ऑफ-लाइफ वाहनांच्या स्क्रॅपिंगसाठी जबाबदार असतात. वाहन स्क्रॅपिंग धोरणाचा उद्देश वैज्ञानिक स्क्रॅपिंग प्रक्रियेद्वारे जुन्या आणि अयोग्य वाहनांमुळे होणारे प्रदूषण पर्यावरणास अनुकूल पद्धतीने कमी करणे, हा आहे. GSR 653(E) द्वारे जारी केलेली अधिसूचना (वेळोवेळी सुधारित केल्यानुसार) असंघटित/अनौपचारिक क्षेत्राच्या औपचारिक स्क्रॅपिंग परिसंस्थेसोबत एकत्रीकरणाची तरतूद करते.आतापर्यंत स्थापन केलेल्या 62 आरव्हीएसएफ पैकी 22 आरव्हीएसएफची उभारणी पूर्वाश्रमीच्या अनौपचारिक स्क्रॅपर्सनी केली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

S.Pophale/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 2043047) Visitor Counter : 49