संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

थिंक 2024 या भारतीय नौदलाच्या प्रश्नमंजुषेसाठी प्रवेशिका पाठवण्याच्या तारखेला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ

Posted On: 07 AUG 2024 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2024

भारतीय नौदलाने थिंक 2024 प्रश्नमंजुषेसाठी प्रवेशिका पाठवण्याची मुदत 31 ऑगस्ट 24 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. तरुण राष्ट्र निर्मात्यांमध्ये देशभक्ती,आत्मनिर्भरता आणि आमच्या समृद्ध वारशाचा अभिमान जागृत करण्याच्या उद्देशाने, भारतीय नौदल या उल्लेखनीय प्रश्नमंजुषा कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता देशभरातील इयत्ता 9 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशिका मागवते.राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धा भावी नेत्यांना भारतीय नौदलाचे अन्वेषण करण्याची संधी देण्यासाठी भरवण्यात येते.'विकसित भारत' या संकल्पनेला अनुसरून, थिंक 2024 ही स्पर्धा सामान्यज्ञान चाचणीपेक्षा सरस असेल.

शीर्ष 16 संघांना केरळ मधील एझिमाला येथे भारतीय नौदल अकादमी (आयएनए) पाहण्यासाठी पूर्ण प्रायोजित सहलीचे आयोजन करण्यात येईल जिथे प्रश्नमंजुषेची उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी पार पडेल. भव्य माउंट डिल्ली, शांत काव्व्याई बॅकवॉटर आणि भव्य अरबी समुद्र यांच्यामध्ये वसलेली भारतीय नौदल अकादमी या कार्यक्रमासाठी एक नयनरम्य आणि शांत पार्श्वभूमी प्रदान करते. या फेऱ्यांसाठी पात्र होणाऱ्या संघांना आशियातील सर्वात मोठ्या नौदल अकादमीमध्ये केवळ एक अनोखा आणि समृद्ध करणारा अनुभवच नव्हे तर भारतीय नौदलाच्या अत्याधुनिक प्रशिक्षण पायाभूत सुविधांची आणि सुखसुविधांची एक मंत्रमुग्ध करणारी अनुभूती घेता येईल. या अनोख्या प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आणि अंतिम फेरीतील सहभागी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे मिळतील तर विजेत्यांना स्मृतीचिन्ह, भेटवस्तू आणि प्रमाणपत्रांसह आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येईल. शिवाय, प्रश्नमंजुषा स्पर्धेतील प्रत्येक सहभागीला थिंक 2024 सहभागाचे प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.

आपल्या विद्यार्थ्यांना ही खास संधी देण्यास उत्सुक असलेल्या शाळांनी 31 ऑगस्ट 24 पूर्वी www.indiannavythinq.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. कोणत्याही शंकांच्या निरसनासाठी हेल्पलाइन क्रमांक 8197579162 किंवा mailthinq2024[at]gmail[dot]com वर संपर्क साधता येईल.

 
S.Patil/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2042750) Visitor Counter : 69