उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींचा 9-10 ऑगस्टला राजस्थान दौरा


उपराष्ट्रपती जोधपूर मध्ये भरणाऱ्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

जोधपूरमधील राजस्थान उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी सोहोळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती होणार सहभागी

Posted On: 07 AUG 2024 3:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2024


उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि डॉ. सुदेश धनखड हे 9 ऑगस्ट 2024 पासून राजस्थानमधील जोधपूर येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर असतील.

आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी उपराष्ट्रपती धनखड हे जोधपूर मध्ये भरणाऱ्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दुसऱ्या दिवशी, उपराष्ट्रपती जोधपूरमधील राजस्थान उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी सोहोळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करतील.


S.Patil/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2042621) Visitor Counter : 23