सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी योजना
Posted On:
06 AUG 2024 2:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2024
अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण विभागाअंतर्गत (दिव्यांगजन) ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मतिमंदता (बौद्धिक अपंगत्व) आणि एकाधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींच्या कल्याणासाठी कार्यरत स्वायत्त संस्था राष्ट्रीय ट्रस्ट, देशातील नोंदणीकृत संस्थांद्वारे (ROs) देशभरात अनाथ असलेल्या अपंग व्यक्ती, ज्या दिव्यांग व्यक्तींचे कुटुंब संकटात आहे आणि ज्या अपंग व्यक्ती (पीडब्ल्यूडी) दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील आहेत, अशा व्यक्तीची आजीवन काळजी आणि देखभाल करण्याकरता समर्थ (रेस्पीट देखभाल योजना), घरौंदा (प्रौढांसाठी सामूहिक निवास योजना) तसेच समर्थ-कम-घरौंदा (निवासी देखभाल योजना) इत्यादी उपक्रम राबवत आहे.
राष्ट्रीय ट्रस्टने आपल्या नोंदणीकृत संस्थांमार्फत देशात 40 ठिकाणी समर्थ (रेस्पीट देखभाल योजना) केंद्रे, घरौंदा (प्रौढांसाठी सामूहिक निवास योजना) केंद्रे आणि समर्थ-कम-घरौंदा (निवासीदेखभाल योजना) केंद्रे स्थापन केली आहेत.
परिशिष्ट-A.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्य मंत्री बी.एल. वर्मा यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
Jaydevi PS/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2042063)
Visitor Counter : 102