गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत 9 ते 15 ऑगस्ट या दिवसांमध्ये घरोघरी तिरंगा ध्वज फडकवण्याचे देशवासियांना केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
03 AUG 2024 1:57PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी देशवासियांना आवाहन केले आहे की, त्यांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत 9 ते 15 ऑगस्ट या दिवसांमध्ये घरोघरी तिरंगा ध्वज फडकवावा आणि https://harghartiranga.com या संकेतस्थळावर आपले सेल्फी अपलोड करावेत.
केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांनी X या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये म्हटले आहे, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या #HarGharTiranga या अभियानाने गेल्या दोन वर्षांमध्ये राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप घेतले असून देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक भारतीयाच्या मनात एकतेची भावना जागी केली आहे. मी देशाच्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी या चळवळीला आणखी बळ द्यावे आणि पुन्हा एकदा त्याच उत्साहाने यामध्ये सहभागी व्हावे. आपला तिरंगा ध्वज, मोठ्या अभिमानाने आपल्या घरी फडकवा, तिरंगा ध्वजाबरोबर आपला सेल्फी काढा आणि तो पुढील हर घर तिरंगा संकेतस्थळावर अपलोड करा:
https://harghartiranga.com. ”
***
S.Kane/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2041114)
आगंतुक पटल : 145