आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशात झिका विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची सद्यःस्थिती

Posted On: 30 JUL 2024 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 जुलै 2024

भारत सरकारने ‘झिका विषाणू रोगाचे व्यवस्थापन’ करण्यासाठी कृती योजना तयार केली आहे. ही योजना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या सार्वजनिक आरोग्याशी निगडीत उपायांबाबत तपशीलवार मार्गदर्शन करते. या योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यात आला असून, संबंधित माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पुढील वेबसाईटवर उपलब्ध आहे:

https://main.mohfw.gov.in/?q=media/disease-alerts/national-guidelines-zika-virus-disease/action-plan-managing-zika-virus-disease.

झिका विषाणू रोगाचा प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सरकारने पुढील सहाय्य प्रदान केले आहे:

I.एकात्मिक विषाणू व्यवस्थापनासाठी आणि समुदाय सहभागाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली.

II.विषाणू प्रजनन तपासणीची स्थानिक तरतूद, आशा (ASHA) कार्यकर्त्यांचा सहभाग, कीटकनाशके, धूर फवारणी यंत्रे, प्रशिक्षण पाठबळ, जनजागृती उपक्रम, ई. यासारख्या प्रतिबंधात्मक कार्यक्रमांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना अर्थसंकल्पीय सहाय्य देण्यात आले.

III.झिका विषाणूसह 33 पेक्षा जास्त प्रादुर्भाव प्रवण संसर्गजन्य रोगांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि त्याला प्रतिसाद देण्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रात (NCDC) एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (IDSP) लागू करण्यात आला. या रोगांची तपासणी आणि देखरेखीसाठी, एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रमा (IDSP) अंतर्गत प्रत्येक राज्यात  जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा (DPHLs) आणि राज्य संदर्भ प्रयोगशाळा (SRLs) यासारख्या प्रयोगशाळा कार्यरत करण्यात आल्या.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय सार्वजनिक आरोग्य विषयक पायाभूत सुविधा आणि सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने विविध योजना आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य प्रदान करते.

झिका विषाणू बाधित रुग्णांच्या विशिष्ट गरजा आणि परिस्थिती लक्षात घेता, त्यांच्यासाठी रुग्णालयांमध्ये राखीव खाटांची व्यवस्था केली जाते.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Annexure

State wise Cases and Deaths reported in Zika Outbreaks during 2017-2023 under IDSP

Name of State

2017

2018

2021

2022

2023

2024*

Total Cases

 

 

 

 

 

 

Gujarat

3

 

 

 

 

 

3

Karnataka

 

 

 

1

 

3

4

Kerala

 

 

84

1

12

 

97

Madhya Pradesh

 

260

 

 

 

 

260

Maharashtra

 

 

 

 

11

10

21

Rajasthan

 

1

 

 

 

 

1

Tamil Nadu

1

 

 

 

 

 

1

Uttar Pradesh

 

 

150

 

 

 

150

Grand Total

4

261

234

2

23

13

537

           * Zika virus cases (l-form) as per IDSP-IHIP portal as on 22.07.2024.

****

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2039180) Visitor Counter : 34