पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हरित भारत अभियान

Posted On: 29 JUL 2024 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जुलै 2024


हरित भारतासाठी राष्ट्रीय अभियान हे हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती आराखड्यांतर्गत नमूद केलेल्या आठ मिशनपैकी एक आहे. भारतातील वनक्षेत्राचे संरक्षण, पुनर्संचयन आणि विस्तार करणे तसेच  निवडक भागातील वन आणि बिगर-वन  क्षेत्रात  पर्यावरण-पुनर्स्थापना उपक्रम हाती घेऊन हवामान बदलाचा सामना करणे हे याचे उद्दिष्ट आहे. हरित भारतासाठी राष्ट्रीय अभियान अंतर्गत उपक्रम आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये उपक्रम सुरू करण्यात आले होते.

आतापर्यंत  155130 हेक्टर क्षेत्रावर वृक्षारोपण/पर्यावरण -पुनर्स्थापना करण्यासाठी सतरा राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशांना 909.82 कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू विभागातील 464.20 हेक्टर क्षेत्र  वृक्षारोपण/पर्यावरण -पुनर्स्थापनासाठी हरित भारत अभियान  अंतर्गत समाविष्ट करण्यात आले  आहे.

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रासह हरित भारत अभियान अंतर्गत वाटप केलेल्या/वितरित केलेल्या आणि वापरलेल्या निधीचा राज्य/केंद्रशासित प्रदेशनिहाय तपशील परिशिष्ट-1 मध्ये दिला  आहे.

(Rs. In Crores)

Sl. No.

State/UT

Funds Allocated/Disbursed

Funds

 Utilized

1

Andhra Pradesh

2.02

2.74

2

Arunachal Pradesh

34.71

10.56

3

Chhattisgarh

12.91

11.38

4

Haryana

17.15

16.82

5

Himachal Pradesh

17.09

6.55

6

Jammu & Kashmir

32.22

31.70

7

Karnataka

14.27

13.56

8

Kerala

16.32

15.74

9

Madhya Pradesh

75.49

88.92

10

Maharashtra

0.00

1.78

11

Manipur

35.19

26.28

12

Mizoram

107.96

86.83

13

Odisha

79.00

74.91

14

Punjab

14.62

9.38

15

Sikkim

27.16

27.16

16

Uttarakhand

122.22

113.31

17

West Bengal

10.95

10.18

18

Uttar Pradesh

5.43

0.00

 

 Total

624.71

547.82

टीप: वापरल्या गेलेल्या निधीमध्ये आर्थिक वर्ष 2019-20 पूर्वी जारी केलेल्या निधीतून  झालेला खर्च देखील समाविष्ट आहे

पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2038665) Visitor Counter : 88