राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

प्रसिद्धी पत्रक

प्रविष्टि तिथि: 28 JUL 2024 8:22AM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

2.  राष्ट्रपतींना खालील राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत. : -      

  • (i)  श्री. हरिभाऊ किसनराव बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती.
  • (ii)  श्री. जिष्णु देव वर्मा यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती.
  • (iii)  श्री. ओम प्रकाश माथूर यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती.
  • (iv)  श्री. संतोष कुमार गंगवार यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती.
  • (v)  श्री. रामेन डेका यांची छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती.
  • (vi)  श्री. सी एच विजयशंकर यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नियुक्ती.
  • (vii)  तेलंगणाचा अतिरिक्त कार्यभार असलेले झारखंडचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती.
  • (viii)  आसामचे राज्यपाल  गुलाबचंद कटारिया यांची पंजाबचे राज्यपाल म्हणून तसेच चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे.
  • (ix)   सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांना आसामचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले गेले असून मणिपूरच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

3. वरील नियुक्त्या हे सर्वजण आपापल्या संबंधित कार्यालयाचा कार्यभार स्वीकारतील त्या तारखांपासून प्रभावी ठरतील.

***

M.Iyengar/S.Mukhedkar/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2038048) आगंतुक पटल : 163
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Hindi_MP , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu