पंतप्रधान कार्यालय

'एक पेड माँ के नाम' अंतर्गत एक रोपटे लावणाऱ्या उपराष्ट्र्पतींची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

Posted On: 27 JUL 2024 10:04PM by PIB Mumbai

 

आपल्या आईच्या स्मरणार्थ उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एक रोपटे लावणे प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांची आई केसरी देवी जी यांच्या सन्मानार्थ आज नवी दिल्लीतील यमुना नदीकाठी असिता या पर्यावरणीय स्थळी एक रोपटे लावले. 

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:

"अनुकरणीय! आईप्रती आदर आणि सन्मान व्यक्त करत @VPIndia जी यांनी एक रोपटे लावणे हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे."

***

M.Pange/S.Kane/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2038011) Visitor Counter : 12


Read this release in: English