ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

भारतीय मानक ब्युरोने विविध प्रमुख तांत्रिक संस्थांमधील प्राध्यापकांचे 82 प्रकल्प केले मंजूर

Posted On: 24 JUL 2024 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जुलै 2024

 

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने (BIS) आपल्या संशोधन आणि विकास उपक्रमांचा अधिक विस्तार करण्यासाठी,त्यात विविधता आणण्यासाठी आणि आपली गती वाढवण्यासाठी आयआयटी,एन आयटी यांसारख्या विविध प्रमुख तांत्रिक संस्थांच्या प्राध्यापकांसह इतर संस्थांतील तज्ञांचे 82 संशोधन आणि विकास (R&D) प्रकल्प मंजूर केले आहेत.

हे प्रकल्प केवळ सैद्धांतिक पुनरावलोकनांपुरते मर्यादित नसून तर विस्तृत क्षेत्र-स्तरीय अभ्यासांचा त्यात समावेश आहे;तसेच यासाठी प्रत्येकी दहा लाख रुपयांपर्यंतच्या रकमेचा निधी निश्चित केला असून सहा महिन्यांत ते पूर्ण करण्याची कालमर्यादा त्यासाठी आखून दिलेली आहे.यात कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, वैद्यकीय उपकरणे, अक्षय ऊर्जा, शाश्वतता, स्मार्ट शहरे आणि डिजिटल परिवर्तन:या क्षेत्रातील अत्याधुनिक कार्यक्षेत्रांचा समावेश आहे. 

या उदयोन्मुख क्षेत्रांना संधी देत, ग्राहकांचे संरक्षण करणारी आणि नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करणारी मानके विकसित करण्याचे बीआयएसचे (BIS)  उद्दिष्ट आहे.

82 मंजूर प्रकल्पांव्यतिरिक्त, आणखी 99 प्रकल्पांचाही  मंजुरी देण्याच्या प्रक्रियेत समावेश आहेत, त्याचप्रमाणे 66 प्रकल्पांसाठी अर्ज उपलब्ध झाले आहेत. या संधी बीआयएसच्या संकेतस्थळावर संशोधन आणि विकास (BIS R&D projects) याअंतर्गत उपलब्ध आहेत. या उपक्रमामुळे मानकीकरण प्रक्रियेचा स्तर उंचावत असून संपूर्ण भारतातील शैक्षणिक संस्थांमध्ये नवोन्मेषाली आणि उत्कृष्ट तेच निर्माण करण्याचे वातावरण निर्माण करून संशोधकांसाठी अनेक संधी निर्माण होतात.

या प्रयत्नांचे महत्त्व विशद करताना,बीआयएसचे महासंचालक श्री प्रमोद कुमार तिवारी,  यांनी सांगितले, "शैक्षणिक संस्थांसोबतचे आमचे सहकार्य आणि अनेक संशोधन आणि विकास प्रकल्पांना मंजूरी हे तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने उद्योगांची प्रगती आणि विकास करत  मानकीकरण प्रक्रिया पुढे नेण्याप्रती आमची वचनबद्धता दर्शवते.संशोधन आणि विकासावर वाढीव लक्ष केंद्रित करून,आमच्या मानके तयार करण्याच्या प्रक्रियेत आमची मानके मजबूत करत, संबंधित आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योग पद्धतींच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम आहेत, याची खात्री करणे हे आमचे उद्दिष्ट आहे

बीआयएस(BIS)सर्वसमावेशक, अद्ययावत मानके विकसित करण्यासाठी समर्पित आहे जे नवीनतम तांत्रिक कल आणि उद्योग पद्धती यांना प्रतिबिंबित करतात.R&Dच्या या वाढीव प्रयत्नांद्वारे, BIS ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणारी सुरक्षित, अधिक विश्वासार्ह बाजारपेठ भारतात विकसित करण्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करते

भारतीय मानक ब्युरो (BIS), ही भारताची राष्ट्रीय मानक संस्था म्हणून, उत्पादने, प्रक्रिया आणि सेवांसाठी भारतीय मानकांच्या विकासाचे नेतृत्व करत आहे.आजपर्यंत, बीआयएसने 22,000 हून अधिक भारतीय मानके तयार केली आहेत, जी देशातील विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.  मानकीकरण प्रक्रियेत संशोधन आणि विकासाचे महत्त्व ओळखून, बीआयएस वेगवान तांत्रिक प्रगती आणि व्यवसाय करत सामाजिक क्षेत्रातील परिवर्तनांमुळे उद्भवलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपले प्रयत्न तीव्र करत आहे.

उत्पादन क्षेत्रातील वाढते वैविध्य, नवसंकल्पना आणि गुंतागुंत आणि सेवांच्या उत्क्रांतीला प्रतिसाद म्हणून, बीआयएसने(BIS) आरॲन्डडी (R&D) प्रकल्पांना मानकीकरण प्रक्रियेत एकत्र आणण्याच्या गरजांवर भर दिला आहे.  या एकत्रीकरणासाठी संपूर्ण संशोधन आणि विकास कार्य करण्यास सक्षम विषयतज्ञांच्या विस्तृत नेटवर्कचा लाभ घेणे आवश्यक आहे.विद्यमान नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी, BIS ने IIT आणि NIT सह प्रमुख शैक्षणिक संस्थांसोबत सामंजस्य करार (MoUs) केले आहेत, ज्याद्वारे त्यांचा प्राध्यापक वर्ग आणि संशोधकांकडे असलेल्या अफाट बौद्धिक भांडवलाचा त्यासाठी उपयोग होईल.

या सामंजस्य करारांद्वारे, शैक्षणिक संस्थांमधील संशोधन परिसंस्थेला समर्थन देत मानके तयार करण्यासाठी आवश्यक संशोधन आणि विकासाला चालना देणे आहे,हे बीआयएसचे उद्दिष्ट आहे.या धोरणात्मक भागीदारीमुळे संशोधन आणि विकास यासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन सुलभ होईल, तसेच मानकीकरणासाठी निवडलेल्या विषयांवर लक्ष केंद्रित करत,गट चर्चा आणि उत्पादन निर्मिती आणि सेवा वितरण यातील वर्तमान प्रक्रिया आणि पद्धतींचा तपशीलवार क्षेत्र-स्तरीय अभ्यास यात समाविष्ट आहे.

बीआयएसच्या संशोधन आणि विकास (R&D) उपक्रमांबद्दल अधिक माहितीसाठी आणि प्रकल्पांच्या उपलब्धतेची माहिती घेण्यासाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्या : www.bis.gov.in,

 

* * *

S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2036400) Visitor Counter : 8