श्रम आणि रोजगार मंत्रालय

केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये रोजगार, कौशल्य, एमएसएमई आणि मध्यमवर्गावर विशेष भर दिल्याबद्दल डॉ. मनसुख मांडविया यांनी मानले पंतप्रधानांचे आभार


केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 शेतकरी, गरीब, तरुण आणि महिलांच्या कल्याणाचे नवीन मार्ग खुले करतो

Posted On: 23 JUL 2024 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जुलै 2024

 

शेतकरी, गरीब, तरुण आणि महिलांच्या कल्याणासाठी नवीन मार्ग खुले करणाऱ्या दूरदर्शी केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 साठी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

रोजगार, कौशल्य, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तसेच मध्यमवर्ग या विषयांवर लक्ष केंद्रित करून, हा अर्थसंकल्प भारताच्या सामाजिक-आर्थिक परिदृश्यात परिवर्तन करण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी उपक्रम सादर करतो आणि प्रोत्साहने देतो, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केले की, पंतप्रधानांचे पाच योजना आणि उपक्रमांचे रुपये 2 लाख कोटी केंद्रीय खर्चाचे पॅकेज हा पुढील पाच वर्षांत 4.1 कोटी तरुणांना संधी निर्माण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.  विशेषत: या उद्दिष्टांसाठी रुपये 1.48 लाख कोटींची  भरीव गुंतवणूक शिक्षण, रोजगार आणि कौशल्य वाढवण्याच्या सरकारच्या समर्पणाला अधोरेखित करते, असेही ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी अधोरेखित केले की केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये केलेल्या घोषणा तरुणांसाठी अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी, कामगार शक्तीमध्ये कौशल्य निर्माण करण्यासाठी आणि व्यवसाय सुलभता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

रोजगाराशी निगडित प्रोत्साहन योजना आणि शिक्षण आणि कौशल्यामध्ये भरीव गुंतवणूक यासारख्या सर्वसमावेशक उपक्रमांची रचना विविध क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करण्यासाठी करण्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केले.

त्यांनी पुढे नमूद केले की, प्रथमच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन आणि कर्मचारी आणि नियोक्ते दोघांनाही पाठिंबा देऊन, अधिकाधिक व्यक्तींना औपचारिक कर्मचाऱ्यांमध्ये सामावून घेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

याव्यतिरिक्त, ई-श्रम पोर्टलचे इतर कल्याणकारी योजनांसोबत एकत्रीकरण करणे आणि श्रम सुविधा आणि समाधान पोर्टलच्या पुनर्रचनेमुळे अनुपालन प्रक्रिया सुलभ होतील, ज्यामुळे उद्योग आणि व्यापारामध्ये व्यवसायसुलभता येईल, असे त्यांनी पुढे सांगितले.

डॉ. मांडविया यांनी विश्वास व्यक्त केला की, या उपायांसह, महिलांचा श्रमशक्तीमध्ये सहभाग वाढवण्याच्या तसेच एमएसएमईंना पाठिंबा देण्याच्या केंद्रित प्रयत्नांमुळे अधिक गतिमान आणि कुशल कामगार शक्ती निर्माण होईल, परिणामी आर्थिक वाढ आणि विकासाला चालना मिळेल.

 

* * *

S.Patil/N.Mathure/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2036124) Visitor Counter : 7