सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ज्येष्ठ कलाकारांसाठी आर्थिक सहाय्य कार्यक्रम

Posted On: 22 JUL 2024 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जुलै 2024


केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने 'ज्येष्ठ कलाकारांसाठी आर्थिक सहाय्य' ही योजना राबवली जात आहे. या योजने अंतर्गत रु. 72,000/- पेक्षा जास्त उत्पन्न नसलेल्या आणि 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिकच्या वयोगटात येत असलेल्या ज्येष्ठ कलाकारांना आर्थिक सहाय्य दिले जात आहे. या योजनेसाठी निवड झालेल्या अशा ज्येष्ठ कलाकारांना दरमहा जास्तीत जास्त रु.6000/- इतके आर्थिक सहाय्य दिले जात आहे. आपल्या काम करण्याच्या वयात महत्त्वाचे योगदान दिलेल्या किंवा, आजही कला आणि साहित्य अशा क्षेत्रात योगदान देत असलेल्या, मात्र वृद्धापकाळामुळे स्थिर उत्पन्न मिळवू शकत नसलेल्या जुन्या वयोवृद्ध कलावंत आणि अभ्यासकांची आर्थिक आणि सामाजिक -आर्थिक स्थिती सुधारता यावी यासाठी, त्यांना आर्थिक पाठबळ पुरवणे हा या योजनेचा उद्देश आहे.

या योजने अंतर्गत गेल्या पाच वर्षांमध्ये ज्येष्ठ कलाकारांना वितरित करण्यात आलेल्या निधीचा राज्यनिहाय तपशील पुढे दिलेल्या तक्त्यात मांडला आहे.

         

   (Rs. In Lakh)

Sl. No.

States

FY-2019-20

FY-2020-21

FY-2021-22                             

FY-2022-23                              

FY - 2023-24                             

 

 

Amount Disbursed

Amount Disbursed

Amount Disbursed

Amount Disbursed

Amount Disbursed

1

Andhra Pradesh

22.16

5.10

72.29

84.66

153.30

2

Assam

1.92

0.96

0.48

1.57

2.41

3

Bihar

-

-

-

-

15.47

4

Delhi

-

-

-

-

5.87

5

Haryana

0.04

-

0.93

0.56

3.69

7

Jharkhand

1.11

2.28

3.00

3.59

3.88

8

Karnataka

30.29

29.97

59.55

64.32

341.98

9

Kerala

13.34

8.18

24.49

25.30

64.21

10

Madhya Pradesh

5.41

2.44

5.04

3.86

6.95

11

Maharashtra

85.86

106.61

190.49

273.49

795.97

12

Manipur

3.08

3.36

7.84

0.60

14.70

13

Nagaland

0.04

0.48

0.92

0.12

3.28

14

Odisha

84.04

119.46

276.95

306.77

1063.40

16

Rajasthan

0.87

0.07

1.23

0.71

1.36

17

Tamil Nadu

9.92

0.87

15.49

14.60

46.96

18

Telangana

86.18

53.20

217.29

268.16

274.94

19

Tripura

0.06

0.24

0.92

0.12

-

20

Uttar Pradesh

3.20

5.12

13.08

15.46

67.24

21

Uttarakhand

-

-

-

-

2.43

22

West Bengal

8.26

5.09

12.31

11.71

28.53

 

Total

355.82

343.46

902.30

1075.60

2896.57

 

LIC*

1461.78

527.85

639.87

783.58

-

 

G. Total

1817.60

871.31

1542.17

1859.18

2896.57

* भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या माध्यमातून 2022 - 23 या वर्षापर्यंत आर्थिक मदत पुरवल्या गेलेल्या लाभार्थ्यांची राज्यनिहाय आकडेवारी उपलब्ध नाही.

ही माहिती केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी आज (22 जुलै 2024 ) लोकसभेत लेखी उत्तरात दिली आहे.

 

Jaydevi PS/T.Pawar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2035347) Visitor Counter : 78