राष्ट्रपती कार्यालय
लष्करी अभियंता सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
Posted On:
12 JUL 2024 1:59PM by PIB Mumbai
लष्करी अभियंता सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी आज (12 जुलै 2024) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की लष्करी अभियंता सेवा(एमईएस) ही भारतीय सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या संस्थांपैकी एक असून सेवादलांबरोबरच संरक्षण मंत्रालयाच्या इतर अनेक संस्थांना देखील सेवा पुरवते. आपल्या संरक्षण दलांना मजबूत पायाभूत सुविधा आणि अन्य उत्तम सुविधा मिळतील याची खातरजमा करणे हे एमईएसचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणूनच , एमईएस अधिकाऱ्यांच्या यशाची कसोटी हीच असेल की ते पुरवत असलेल्या पायाभूत सुविधा किंवा अन्य सुविधा विश्वासार्हता आणि गुणवत्तेच्या मानकांची पूर्तता करणाऱ्या असतील. त्यांनी एमईएस अधिकाऱ्यांना नेहमी सतर्क राहण्याचा सल्ला दिला. आपल्या सेवेमध्ये सर्वोत्तम गुणवत्ता राखल्याने त्यांना आदर प्राप्त करता येईल, असे राष्ट्रपती म्हणाल्या.
राष्ट्रपतींनी एमईएस अधिकाऱ्यांना सांगितले की, पायाभूत सुविधा निर्माण करताना त्यांना हवामान बदलाशी संबंधित काही घटकांशी जुळवून घेणे आणि काहींची तीव्रता कमी करणे या बाबी लक्षात घ्याव्या लागतील. तसेच ते करत असलेल्या कामामधून होणारे कार्बन उत्सर्जन कमीत कमी असावे असे त्या म्हणाल्या. एमईएस या दिशेने प्रयत्न करत आहे हे ऐकून त्यांनी आनंद व्यक्त केला.
एमईएस अधिकाऱ्यांची जबाबदारी केवळ तांत्रिक नाही तर नैतिक आणि व्यवस्थापकीय देखील आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या. आपल्या प्रत्येक कामात देशाच्या साधनसंपत्तीचा सक्षम आणि प्रभावी वापर हवा असा त्यांचा संकल्प असावा. एमईएस अधिकाऱ्यांची कार्यक्षमता आणि नैतिकता देशाची सुरक्षा मजबूत करेल असे राष्ट्रपती म्हणाल्या.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
***
S.Kakade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2032740)
Visitor Counter : 95