वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारतीय कारागिरांना पाठबळ देऊन जगभरातील मुलांना प्रेरणा आणि शिक्षण देणाऱ्या खेळण्यांद्वारे सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती विकसित करा: केंद्रीय राज्यमंत्री जितिन प्रसाद
Posted On:
10 JUL 2024 5:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2024
भारतीय कारागिरांना पाठबळ देऊन जगभरातील मुलांना प्रेरणा आणि शिक्षण देणाऱ्या खेळण्यांद्वारे सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती विकसित करण्याकरिता केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी खेळणी उद्योगाला प्रोत्साहन दिले. 8 जुलै 2024 रोजी नवी दिल्ली येथे टॉय असोसिएशन ऑफ इंडियाने उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) आणि इन्व्हेस्ट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या 'टॉय सीईओ मीट' अर्थात खेळणी उद्योगातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत बीजभाषण करताना मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या संकल्पनेवर प्रकाश टाकला. त्यांनी सहभागींना सहयोग सुरू ठेवण्यासाठी आणि भारताचा खेळणी बनवण्याचा वारसा साजरा करण्यास प्रवृत्त केले.
दुसऱ्या टॉय सीईओ मीट द्वारे भारताला जागतिक खेळणी केंद्र म्हणून स्थान देण्याच्या उद्देशाने भारतीय आणि जागतिक खेळणी उद्योगातील सहकार्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले. या कार्यक्रमाला वॉलमार्ट, ॲमेझॉन, स्पिन मास्टर, आयएमसी टॉईज इत्यादींसह प्रमुख जागतिक कंपन्या आणि सनलॉर्ड ॲपेरेल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्रा. लि., प्लेग्रो टॉईज इंडिया प्रा. लिमिटेड, इ. स्वदेशी खेळणी उद्योगातील प्रतिनिधी उपस्थित होते.
डीपीआयआयटी चे सचिव राजेश कुमार सिंह यांनी सहभागींना संबोधित करताना सरकारी उपक्रमांबरोबरच स्वदेशी उत्पादकांच्या प्रयत्नांमुळे भारतीय खेळणी उद्योगाची उल्लेखनीय वाढ झाली असल्याचे अधोरेखित केले. या घडामोडी भारताची वाढती आत्मनिर्भरता आणि खेळणी उत्पादनात वाढलेली उत्पादन क्षमता दर्शवतात, असे त्यांनी नमूद केले.
हितधारकांच्या चर्चासत्रादरम्यान, जागतिक खेळाडू जसे की वॉलमार्ट, आयएमसी टॉईज, स्पिन मास्टर इत्यादी जागतिक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी व्यवसाय वृद्धीच्या यशोगाथा सांगितल्या आणि व्यवसायाचा विस्तार भारतात करण्यासाठी औत्सुक्य दाखवले. वक्त्यांनी सामायिक केलेल्या विचारांद्वारे उपस्थितांना भारतीय खेळणी उद्योगाविषयी अवगत केले तसेच वाढ आणि सहयोगाची संधी दिली.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2032158)
Visitor Counter : 56