पंतप्रधान कार्यालय
उन्नाव रस्ते अपघाताबद्दल पंतप्रधानांकडून तीव्र दुःख व्यक्त, मदत केली जाहीर.
प्रविष्टि तिथि:
10 JUL 2024 10:45AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उन्नावमधील रस्ते अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यात गुंतले असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने (PMO) X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
“ उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे झालेला रस्ते अपघात अत्यंत दुःखदायक आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो. अशा कठीण परिस्थितीत ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. यासोबतच, या दुर्घटनेत जखमी झालेले लोक लवकरच बरे होतील अशी मी कामना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत आहे: PM @narendramodi”
उन्नाव येथील दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दिली जाणार आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने (PMO) X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
“उन्नावमधील दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दिली जाणार अशी घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.”
***
SushmaK/SMukhedkar/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2032034)
आगंतुक पटल : 113
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam