दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

केंद्रीय दूरसंचार विभागाने श्री अमरनाथजी यात्रा 2024 साठीच्या दूरसंचार सेवा विषयक पायाभूत सुविधांमध्ये केली वाढ


मोबाईल फोनची सेवा सुरळीतपणे उपलब्ध होण्यासाठी यात्रेच्या मार्गात 31 नवी ठिकाणे उभारून एकूण ठिकाणांची संख्या 82 पर्यंत वाढवण्यात आली आहे

यात्रेकरूंसाठी मोबाईल सेवेचा आणखी विस्तार करण्याच्या उद्देशाने सिमकार्ड वितरण केंद्रे उघडण्यात आली आहेत

लखनपूर ते काझीगुंड आणि काझीगुंड ते पहलगाम आणि बालताल या मार्गांवर अनेक ठिकाणी 5जी सेवा उपलब्ध करून देण्यासह या संपूर्ण मार्गावर मोबाईल सेवा उपलब्ध झाली आहे

Posted On: 08 JUL 2024 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2024

 

श्री अमरनाथजी यात्रा 2024 मध्ये सहभागी झालेल्या यात्रेकरूंसाठी मोबाईल फोनची सेवा सुरळीतपणे उपलब्ध असेल याची सुनिश्चिती करण्याच्या उद्देशाने केंद्रीय दूरसंचार विभागाने (डीओटी) दूरसंचार सेवा विषयक पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणांची घोषणा केली आहे. यात्रेच्या मार्गावर यात्रेकरूंना अखंडितपणे मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बीएसएनएल, एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांसह इतर महत्त्वाच्या सेवा पुरवठादारांच्या (टीएसपीज) सहयोगातून संबंधित पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.

वाढीव संपर्क सुविधा:

  • मोबाईल सेवा परिचालनाच्या सुनिश्चितीसाठी यात्रा मार्गावर एकूण 82 ठिकाणे (बीएसएनएल, एअरटेल आणि आरजेआयएल) कार्यरत करून देण्यात आली आहेत. समाविष्ट झालेली महत्त्वाची ठिकाणे खाली तक्त्यात दिली आहेत.
  • अमरनाथ यात्रेच्या मार्गावर एकूण 31 नवी कार्यस्थळे उभारण्यात आली असून त्यामुळे 2023 मध्ये कार्यरत असलेल्या एकूण 51 कार्यस्थळांची संख्या वाढून 2024 मध्ये 82 झाली आहे. यात्रेकरू तसेच त्या भागातील सर्वसामान्य नागरिक यांना अखंडित मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही सुधारणा करण्यात आली आहे.
  • लखनपूर ते काझीगुंड आणि काझीगुंड ते पहलगाम आणि बालताल या मार्गांवर सर्व ठिकाणी आता 2जी, 3जी आणि 4जी सेवा उपलब्ध झाली असून या मार्गांवर अनेक ठिकाणी यात्रेकरू तसेच सामान्य जनतेसाठी  5जी तंत्रज्ञान देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
  • यात्रेकरुंपर्यंत दूरसंचार सेवेचा आणखी विस्तार करण्याच्या दृष्टीने मार्गावरील आधीच्या ठिकाणांसह पुढील काही महत्त्वाच्या ठिकाणांवर सिम कार्ड्स वितरण केंद्रे उभारण्यात आली आहेत: लखनपूर, भगवती नगर येथील यात्री निवास, चंदरकोट, अनंतनाग, श्रीनगर, श्रीनगर विमानतळ, पहलगाम, सोनमर्ग आणि बालताल.

श्री अमरनाथ यात्रा 2024 च्या काळात सातत्यपूर्ण मोबाईल सेवेची सुनिश्चिती करण्याच्या उद्देशाने टीएसपीजनी खालील पद्धतीने बीटीएसची उभारणी केली आहे.

  • सेवा पुरवठादार-स्थान सेवा पुरवठादार-स्थान संपर्क स्थळांची निश्चिती
  • बेस कॅम्प (पहलगाम आणि बालताल) ते पवित्र गुहा

सेवा पुरवठादार कंपनी

कार्यस्थळे (ठिकाणे)

एअरटेल

19 ठिकाणी 2जी, 4जी आणि 5जी सेवा उपलब्ध

बीएसएनएल

27बीटीएसएसवर 2जी,3जी तसेच स्वदेशी 4जी सेवा उपलब्ध

आरजेआयएल

36 ठिकाणी 4जी, 5जीसेवा उपलब्ध (30 ठिकाणी 4जी आणि 5जी सेवा तर 06 ठिकाणी 4जी सेवेची उपलब्धता)

 

श्री अमरनाथ यात्रा 2024 सारख्या अत्यंत महत्त्वाच्या यात्रेला पाठबळ देण्यासाठी प्रगत दूरसंचार तंत्रज्ञानाचा वापर करून घेत, या यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व यात्रेकरुंना सुरळीत तसेच अविरत संपर्क सेवेची उपलब्धता सुनिश्चित करून देण्यासाठी केंद्रीय दूरसंचार विभाग सर्वथा वचनबद्ध आहे.

 

* * *

JPS/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2031570) Visitor Counter : 17