संसदीय कामकाज मंत्रालय

संसदेच्या दोन्ही सदनाचे कामकाज संस्थगित केल्यानंतर संसदेचे अधिवेशन समाप्त


539 नवीन सदस्यांनी घेतली शपथ

दोन्ही सदनांनी 100 टक्क्यांहून अधिक उत्पादकता नोंदवली

Posted On: 03 JUL 2024 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 जुलै 2024

 

18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर लोकसभेच्या पहिल्या सत्राची व राज्यसभेच्या 264 व्या सत्राची सुरुवात अनुक्रमे 24 व 27 जूनला करण्यात आली. लोकसभा काल 2 जुलै 2024 रोजी संस्थगित करण्यात आली, तर राज्यसभा आज 3 जुलै 2024 रोजी संस्थगित करण्यात आली.

केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री किरण रिजिजू यांनी संसदेतील कामकाजाबद्दल आज नवी दिल्लीत वार्ताहरांना माहिती दिली.

लोकसभेतील पहिल्या दोन दिवसांचा वेळ 18व्या लोकसभेतील नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्यासाठी राखून ठेवला गेला होता. अधिवेशनादरम्यान एकूण 542 सदस्यांपैकी 539 सदस्यांनी शपथ घेतली.

शपथ देण्यासाठी  राष्ट्रपतींनी घटनेचे  कलम 95(1) अंतर्गत भर्तृहरी मेहताब यांची नियुक्ती हंगामी सभापती म्हणून केली होती. तसेच सुरेश कोदीकुन्निल , राधा मोहन सिंग, फगन सिंग कुलस्ते, टी आर बालू  आणि सुदीप बंदोपाध्याय यांची नियुक्ती घटनेचे कलम 99 अंतर्गत सदस्यांना ज्यांच्यासमोर शपथ घेता येईल अशासाठी केली होती.

लोकसभा सभापतीपदासाठी 26 जून 2024 रोजी निवडणूक घेण्यात आली आणि लोकसभा सदस्य ओम बिर्ला यांची निवड आवाजी मताने सभापती म्हणून करण्यात आली. त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आपल्या मंत्रिमंडळाची ओळख करून दिली.

27 जून 2024 रोजी, राष्ट्रपतींनी संविधानाच्या कलम 87 अन्वये एकत्र जमलेल्या संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले आणि सरकारच्या भूतकाळातील कामगिरीचा तपशील दिला आणि देशाच्या भविष्यातील विकासाचा पथदर्शक आराखडा देखील तपशीलवार सादर केला.

27 जून 2024 रोजी पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची राज्यसभेत ओळख करून दिली.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील दोन्ही सभागृहांमधील चर्चेचे 28 जून 2024 रोजी नियोजन करण्यात आले.

लोकसभेतील, व्यत्ययांमुळे, या विषयावरील चर्चा 1 जुलै 2024 रोजी सुरू होऊ शकली. लोकसभेत खासदार अनुराग ठाकूर यांनी चर्चेला सुरुवात केली तर खासदार बांसुरी स्वराज यांनी अनुमोदन दिले . एकूण 68 सदस्यांनी चर्चेत भाग घेतला तर 50 हून अधिक सदस्यांनी सभागृहाच्या पटलावर आपली भाषणे मांडली. 18 तासांपेक्षा जास्त काळ झालेल्या चर्चेनंतर 2 जुलै 2024 रोजी पंतप्रधानांनी चर्चेला उत्तर दिले. लोकसभेत  सुमारे 34 तासांच्या एकूण 7 बैठका झाल्या आणि एक दिवसाचे कामकाज वाया जाऊनही उत्पादकता 105% इतकी राहिली.

राज्यसभेत, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चा 28 जून 2024 रोजी खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी सुरू केली, आणि खासदार कविता पाटीदार यांनी अनुमोदन दिले.

एकूण 76 सदस्यांनी 21 तासांहून अधिक काळ चाललेल्या चर्चेत भाग घेतला आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 जुलै 2024 रोजी उत्तर दिले.

राज्यसभेची एकूण उत्पादकता 100% पेक्षा जास्त राहिली.

 

* * *

S.Kane/Uma/Rajshree/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2030499) Visitor Counter : 50