रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रेल्वेने जून 2024 मध्ये गाठला 135.46 मेट्रिक टन मालवाहतुकीचा टप्पा


गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत मालवाहतुकीतून प्राप्त महसुलात 1481.29 कोटी रुपयांची वाढ

Posted On: 02 JUL 2024 5:07PM by PIB Mumbai

 

भारतीय रेल्वेने जून 2024 मध्ये 135.46 मेट्रिक टन मालवाहतुकीचा टप्पा गाठला असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील म्हणजे जून 2023 च्या 123.06 मेट्रिक टन च्या तुलनेत सुमारे 10.07% ची वाढ नोंदवली आहे. भारतीय रेल्वेने या कालावधीत प्राप्त केलेला मालवाहतुकीचा महसूल जून 2023 च्या 13,316.81 कोटी रुपयांच्या तुलनेत 14,798.11 कोटी रुपये इतका असून त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 11.12% ची वाढ दिसून आली.

भारतीय रेल्वेने या कालावधीत 60.27 मेट्रिक टन कोळसा (आयात केलेला कोळसा वगळून), 8.82 मेट्रिक टन आयात कोळसा, 15.07 मेट्रिक टन  लोहखनिज, 5.36 मेट्रिक टन पिग आयर्न आणि फिनिश्ड स्टील, 7.56 मेट्रिक टन सिमेंट (क्लिंकर वगळता),  5.28 मेट्रिक टन क्लिंकर, 4.21 मेट्रिक टन अन्नधान्य,  5.30 मेट्रिक टन खते,  4.18 मेट्रिक टन खनिज तेल, कंटेनर सुविधेच्या माध्यमातून 6.97 मेट्रिक टन आणि इतर वस्तूंमध्ये 10.06 मेट्रिक टन इतकी वाहतूक केली.

''हंग्री फॉर कार्गो''  हा मंत्र अनुसरत भारतीय रेल्वेने व्यवसाय सुलभतेत सुधारणा करण्यासाठी तसेच स्पर्धात्मक किमतीत सेवा वितरण सुधारण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. ग्राहककेंद्रित दृष्टीकोन आणि सुगम धोरण निर्मितीद्वारे समर्थित व्यवसाय विकास युनिट्सच्या कार्यामुळे रेल्वेला हे महत्त्वपूर्ण यश साध्य करण्यात मदत झाली.

***

S.Kane/B.Sontakke/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2030276) Visitor Counter : 87