शिक्षण मंत्रालय

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 साठी 15 जुलै 2024 पर्यंत  स्वनामांकन खुले

Posted On: 02 JUL 2024 3:51PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 साठी पात्र शिक्षकांकडून ऑनलाईन स्व-नामांकन 27 जून 2024 पासून शिक्षण मंत्रालयाच्या http://nationalawardstoteachers.education.gov.in या पोर्टलवर मागविण्यात येत आहे. ऑनलाईन स्व-नामांकन पाठवण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2024 आहे. यावर्षी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर तीन टप्प्यातील निवड प्रक्रियेद्वारे 50 शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली जाईल. राष्ट्रपतींच्या हस्ते येत्या 5 सप्टेंबर 2024 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

कठोर, पारदर्शक आणि ऑनलाइन निवड प्रक्रियेद्वारे निवडलेल्या देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यासाठी, शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे दरवर्षी शिक्षक दिनी 5 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. देशातील शिक्षकांच्या अद्वितीय योगदानाचा गौरव करणे आणि ज्या शिक्षकांनी आपल्या निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने केवळ शैक्षणिक गुणवत्ता सुधारली नाही तर त्यांच्या विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध केले आहे त्यांचा सन्मान करणे हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचा उद्देश आहे.

पात्रता निकष :

राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश प्रशासन, स्थानिक संस्था आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश मंडळाशी संलग्न असलेल्या खाजगी शाळांद्वारे चालवल्या जाणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक/माध्यमिक /उच्च/उच्च माध्यमिक शाळांमध्ये काम करणारे शालेय शिक्षक आणि शाळा प्रमुख पुरस्कारासाठी पात्र आहेत.

·केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळा, उदा., केंद्रीय विद्यालये ,जवाहर नवोदय विद्यालय , संरक्षण मंत्रालय  संचालित  सैनिक शाळा, अणुऊर्जा शिक्षण संस्था  द्वारे संचालित शाळा आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या एकलव्य मॉडेल निवासी शाळा  आणि

·केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संबंधित शाळा  (CBSE) आणि भारतीय शाळा प्रमाणपत्र  परीक्षा परिषदेशी (CISCE) संलग्न शाळा.

***

S.Kane/B.Sontakke/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2030245) Visitor Counter : 80