कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते कौटुंबिक निवृत्तीवेतन तक्रार निवारणासाठीच्या विशेष मोहीमेचा प्रारंभ

Posted On: 01 JUL 2024 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2024

 

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज कौटुंबिक निवृत्तीवेनत तक्रार निवारणासाठीच्या विशेष मोहीमेचा प्रारंभ केला. केंद्रिय कार्मिक, लोक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या  100 दिवसांच्या कृती आराखड्याचा एक भाग म्हणून, निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या वतीने ही मोहिम राबवली जात आहे.

निवृत्ती वेतनधारक हे राष्ट्र उभारणीच्या कार्यातले समान भागधारक आहेत, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) (स्वतंत्र प्रभार) आणि पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग आणि कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह  यावेळी म्हणाले. या निवृत्ती वेतनधारकांना सुलभतेने निवृत्ती वेतनाचे वितरण करणे म्हणजे उपकाराची बाब नाही असे ते म्हणाले. हे सर्व ज्येष्ठ नागरिक राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावतील आणि सकारात्मक योगदान देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हे निवृत्ती वेतनधारक आपल्या आजच्या आयुष्यात ज्ञानाच्या संचिताने आणि आपल्या आकलन क्षमतेने कारकीर्दीच्या शिखरावर आहेत, म्हणूनच या सर्वांचे कौशल्य आणि त्यांच्या अनुभवाचा उपयोग देशाच्या विकासासाठी केला जाऊ शकतो, आणि यामुळेच त्यांच्या सेवेचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.

  

ही मोहीम 1 जुलै ते 31 जुलै 2024 अशा महिनाभराच्या कालावधीसाठी राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत CPENGRAMS पोर्टलवर प्रलंबित असलेल्या कौटुंबिक निवृत्तीविषयक प्रकरणांचे वेळेत निराकरण केले जाणार आहे.  या मोहिमेअंतर्गत 46  विभाग /  मंत्रालयांच्या अखत्यारित येत असलेली  कौटुंबिक निवृत्तीविषयक 1891 तक्रारी निवडल्या गेल्या आहेत. CPENGRAMS  पोर्टलवर दरवर्षी 90,000 तक्रारीं नोंदवल्या जातात, या तक्रारींपैकी 25 टक्के तक्रारी कौटुंबिक निवृत्ती वेतनाधारकांच्या असतात. त्यामुळेच ही मोहिम तक्रार निवारणाच्या दृष्टीने प्रभावी ठरणार असल्याचा विश्वासही डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.

 

* * *

S.Kane/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2030100) Visitor Counter : 57