गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी श्री अमरनाथ यात्रेच्या प्रसंगी सर्व भक्तांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
29 JUN 2024 5:49PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी, आज सुरू झालेल्या श्री अमरनाथ यात्रेच्या प्रसंगी सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.
X या समाज माध्यमावर पोस्ट करताना अमित शाह म्हणाले की "श्री अमरनाथ यात्रा ही भारतीय संस्कृतीच्या परंपरा आणि शाश्वततेचे एक स्थायी प्रतीक आहे. आज या दिव्य यात्रेला सुरुवात होत आहे. बाबांच्या दर्शन-पूजनासाठी सर्व भक्तांना माझ्या शुभेच्छा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आमचे सरकार भक्तांच्या सुरक्षित, सुखकर आणि आनंददायी प्रवासासाठी वचनबद्ध आहे, आणि भक्तांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व व्यवस्था केली आहे. हर-हर महादेव!"
***
M.Pange/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2029562)
Visitor Counter : 94