ग्रामीण विकास मंत्रालय

दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मोहिमेने सेवा क्षेत्रातील उपक्रमांमधील महिला स्वयं-सहायता गटांना एकत्र करून 'मेकिंग ऑफ लखपती दीदी' या विषयावर कार्यशाळेचे केले आयोजन

Posted On: 28 JUN 2024 5:54PM by PIB Mumbai

 

पंतप्रधानांच्या दूरदृष्टीच्या अनुषंगाने 3 कोटी लखपती दीदी बनवण्याच्या दिशेने आपले प्रयत्न आणखी वाढवत, ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका  मोहिमेने आज महिला स्वयं-सहायता गटांना सेवा क्षेत्रातील उपक्रमांमध्ये एकत्रित करण्यासाठी 'मेकिंग ऑफ लखपती दीदी' या विषयावर राष्ट्रीय भागधारक सल्लागार कार्यशाळा आयोजित केली.

कार्यशाळेचे उद्घाटन करताना ग्रामीण आजीविका विभागाचे अतिरिक्त सचिव चरणजीत सिंह यांनी अशा महत्त्वाच्या विषयावर कार्यशाळा आयोजित केल्यामुळे  हा ऐतिहासिक दिवस असल्याचे मत व्यक्त केले.  ही मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेनुसार लखपती दीदींसाठी प्रयत्नशील आहे. सेवा क्षेत्रातील उद्योगांच्या संधींचा शोध घेत आणि त्यात सर्वांचा समावेश करून लखपती दीदी विषयक उपक्रमांना बळकटी देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

सिंह यांनी या वस्तुस्थितीवर प्रकाश टाकला की सेवा क्षेत्राचा आज राष्ट्रीय दरडोई उत्पन्नामध्ये सुमारे 50%, नोकऱ्यांमध्ये 31% वाटा आहे आणि त्यामुळे  स्वयं-सहायता गट  समुदायाला त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि त्यांना लखपती दीदी बनण्यासाठी सक्षम बनवणे तसेच त्यांची व्यापकता वाढावी यासाठी कोणत्या उप-योजना सुरू केल्या जाऊ शकतात यावर खुल्या मनाने चर्चा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

यासंदर्भात बोलतांना  ग्रामीण उपजीविका विभागाच्या सहसचिव स्वाती शर्मा म्हणाल्या की मागणीवर आधारित आर्थिक क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे आणि या दिशेने   स्वयं-सहायता गट  समुदायाला त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि त्यांना लखपती दीदी बनण्यासाठी सक्षम बनवणे. दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका  मोहिम  त्यांच्या विविध भागधारकांसह  स्वयं-सहायता गट  दीदींना  यशस्वी सेवा क्षेत्रातील उद्योग निर्माण करण्याच्या उद्दिष्टासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि सहकार्य करेल.

सेवा क्षेत्रातील महिला बचत गटांसमोरील सद्य परिस्थिती, संधी, क्षमता आणि आव्हाने समजून घेणे, महिला बचत गटांना सेवा उपक्रमांमध्ये समाकलित करण्याच्या सर्वोत्तम पद्धती आणि यशस्वी प्रतिमान ओळखणे आणि पुढे जाण्यासाठी  मार्गदर्शन करणे या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विविध भागधारकांच्या  सहकार्याने काम करणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या सेवा क्षेत्रामध्ये  स्वयं-सहायता गटांच्या   यशस्वी समाकलनासाठी मार्ग तयार करणे आणि रणनीती विकसित करणे हे उद्दिष्ट होते.  सहभागींच्या यादीत अकरा मंत्रालयांचे प्रतिनिधी, दहा राज्य ग्रामीण आजीविका मोहिम आणि इतर भागधारक, क्षेत्र कौशल्य परिषद, राष्ट्रीय संसाधन संघटना आणि तांत्रिक सहाय्य संस्था समाविष्ट होत्या. कार्यशाळेत सहभागींच्या सक्रिय सहभागासह विविध कल्पना आणि विचारांवर खुली चर्चा झाली.

***

S.Patil/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2029415) Visitor Counter : 16