ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
ग्राहक व्यवहार विभागाद्वारे वैध मापनशास्त्र (सामान्य) नियम, 2011 अंतर्गत श्वासातील अल्कोहोलचे प्रमाण मोजण्यासाठी आणि ती दर्शवण्यासाठी श्वास विश्लेषक पुरावा उपकरणांकरिता मसुदा नियम जारी
सदोष उपकरणांमुळे चुकीच्या दंडापासून व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी एक वर्षाच्या आत श्वास विश्लेषक पुरावा उपकरणांचे मुद्रांकन आणि पडताळणी करावी
Posted On:
28 JUN 2024 1:21PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या वैध मापनशास्त्र विभागाने वैध मापनशास्त्र (सामान्य) नियम, 2011 अंतर्गत एव्हिडेंशियल ब्रीथ ॲनलायझर्स अर्थात श्वास विश्लेषक पुरावा उपकरणांसाठी नवीन मसुदा नियम जारी केले आहेत. सार्वजनिक सुरक्षा आणि विश्वास बळकट करण्याच्या हेतूने कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या आणि कार्यस्थळी वापरल्या जाणाऱ्या ब्रीथलायझर चाचण्यांची अचूकता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
सत्यापित आणि प्रमाणित श्वास विश्लेषक पुरावा उपकरणे श्वासोच्छवासाच्या नमुन्यांमधून रक्तातील अल्कोहोलच्या प्रमाणाचे अचूकपणे मोजमाप करतील, ज्यामुळे मद्यधुंद व्यक्तींना लवकर आणि प्रभावीपणे ओळखता येईल. हे रस्त्यावरील अल्कोहोल-संबंधित दुर्घटना टाळण्यास मदत करते तसेच सर्वांसाठी सुरक्षित प्रवासास हातभार लावते.
नवीन नियमांसाठी एव्हिडेंशियल ब्रीथ ॲनलायझर्सना वेगवेगळ्या उपकरणांवर सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह परिणामांची खात्री करून प्रमाणित चाचणी प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. हे मानकीकरण अंमलबजावणी कारवाईत निष्पक्षता आणि अचूकतेवर जनतेचा विश्वास वाढवते.
एव्हिडेंशियल ब्रीथ ॲनालायझर्सची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी वैध मापनशास्त्र कायदा, 2009 नुसार त्यांची पडताळणी आणि मुद्रांकन होणे आवश्यक आहे. ही पडताळणी सदोष उपकरणांमुळे चुकीच्या दंडापासून व्यक्तींचे संरक्षण करते आणि कायदेशीर आणि कार्यस्थळ धोरणांची अखंडता राखण्यात मदत करते.
एव्हिडेंशियल ब्रीथ ॲनालायझर्स रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण मोजण्यासाठी शांततापूर्ण पद्धतीने जलद आणि वेदनारहित नमुना संकलन करतात. जलद विश्लेषण क्षमता ही कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना जलद, माहितीपूर्ण निर्णय घेण्यास अनुमती देते ज्याद्वारे रस्त्यावरील तपासणीची परिणामकारकता वाढते.
मुद्रांकन आणि सत्यापित एव्हिडेंशियल ब्रीथ ॲनालायझर्सची उपलब्धता जनतेसाठी अल्कोहोलमुळे होणारे नुकसान आणि वाहने आणि यंत्रसामग्रीच्या सुरक्षित कार्यान्वयासाठी कायदेशीर मर्यादांबद्दल जागरूकता वाढवू शकते. हे जबाबदार वर्तन आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास प्रोत्साहित करते.
मसुदा नियमांमध्ये "श्वास विश्लेषक पुरावा उपकरण" हे साधन म्हणून परिभाषित केले आहे जे विशिष्ट त्रुटी मर्यादेत उश्वासातील अल्कोहोल प्रमाणाचे मोजमाप करते आणि प्रदर्शित करते आणि श्वासोच्छवासाचे नमुने घेण्यासाठी माऊथपीस वापरणाऱ्या श्वास विश्लेषक पुरावा उपकरणांना देखील हे लागू होते. उपकरणाच्या अचूकतेची खातरजमा करण्यासाठी या नियमात विविध प्रकारच्या चाचणीची तरतूद आहे. वार्षिक पडताळणी ही वापरादरम्यान या उपकरणाच्या अचूकतेची खात्री करेल.
मसुदा नियम 26.07.2024 पर्यंत सार्वजनिक टिप्पण्यांसाठी संकेतस्थळाच्या या लिंकवर उपलब्ध आहेत: https://consumeraffairs.nic.in/sites/default/files/file-uploads/latestnews/Draft_Rule_Breath_Analyser.pdf
***
S.Patil/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2029313)
Visitor Counter : 59