संरक्षण मंत्रालय

हाय स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट ‘अभ्यास’ या प्रणालीच्या विकासात्मक चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण

Posted On: 27 JUN 2024 9:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2024

 

ओडिशातील चांदीपूर एकात्मिक चाचणी तळावरून (आयटीआर) संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) हाय स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट (हीट) 'अभ्यास' या प्रणालीच्या सलग सहा विकासात्मक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. सुधारित रॉकेट (बूस्टर) जुळणीसह अभ्यास प्रणालीच्या आत्तापर्यंत 10 विकास चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.

सुधारित रडार क्रॉस सेक्शन, व्हिज्युअल आणि इन्फ्रारेड ऑगमेंटेशन सिस्टीमचा वापर करून या चाचण्या घेण्यात आल्या. चाचण्यांदरम्यान रॉकेटच्या सुरक्षित उड्डाणाबरोबरच प्रक्षेपकाची दीर्घकाळ टिकणारी क्षमता आजमावण्यात आली. 30 मिनिटांच्या अंतराने दोन प्रक्षेपणं पाठोपाठ केली गेली. त्यामुळे कमीतकमी लॉजिस्टिकचा वापर करून सहजपणे झालेली उड्डाणं करता आली. तीनही संरक्षण दल सेवांच्या प्रतिनिधींनी उड्डाण चाचण्या पाहिल्या.

डीआरडीओच्या बंगळुरूस्थित एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने अभ्यासची रचना केली असून - हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि लार्सन अँड टुब्रो या उत्पादक कंपन्यांनी ते विकसित केले आहे. ही स्वदेशी प्रणाली ऑटो पायलटच्या मदतीने स्वायत्त उड्डाणासाठी तयार करण्यात आली आहे. त्यात लॅपटॉप-आधारित विमानासाठीची भूमी नियंत्रण प्रणाली, उड्डाणपूर्व तपासणी उपलब्ध आहे. उड्डाणानंतरच्या विश्लेषणासाठी उड्डाण कालावधीतील माहितीची नोंद हे या प्रणालीचे एक वैशिष्ट्य देखील आहे. रॉकेटची रचना प्रगत प्रणाली प्रयोगशाळेने केली आहे आणि नेव्हिगेशन प्रणाली हैदराबादच्या रिसर्च सेंटर इमारातने विकसित केली आहे. या प्रस्थापित उत्पादन संस्थांमध्ये आता अभ्यास उत्पादनासाठी सज्ज आहे

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'अभ्यास' च्या विकासात्मक चाचण्या पूर्य केल्याबद्दल डीआरडीओ, सशस्त्र दल आणि संरक्षण क्षेत्राचे कौतुक केले. चाचण्यांचे यशस्वी होणे हे शास्त्रज्ञ आणि संरक्षण क्षेत्रातील समन्वयाची साक्ष देते असे ते म्हणाले.

संरक्षण आणि विकास विभागाचे सचिव तसेच डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनी चाचण्यांशी संबंधित पथकांचे अभिनंदन केले. या प्रणालीत प्रचंड निर्यात क्षमता असून ती किफायतशीर असल्याचे कामत यांनी सांगितले.

 

* * *

S.Patil/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2029211) Visitor Counter : 55