दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

स्पेक्ट्रम लिलाव 2023-24 यशस्वीरित्या संपन्न


दूरसंवाद सेवा प्रदात्यांच्या नवीन स्पेक्ट्रम गरजा पूर्ण करण्यासाठी आणि मोबाइल सेवांचे सातत्य तसेच वाढ याकरिता कालबाह्य होणाऱ्या परवान्यांच्या नूतनीकरणासाठी लिलावाचे आयोजन

एकूण 141.4 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमच्या लिलावाद्वारे 11,340 कोटी रुपयांची महसूल प्राप्ती

विक्री न झालेल्या स्पेक्ट्रमचा पुढच्या वेळी होणार पुन्हा लिलाव

Posted On: 26 JUN 2024 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जून 2024

 

दूरसंवाद सेवा प्रदात्यांच्या नवीन स्पेक्ट्रम गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच सेवांचे सातत्य आणि वाढ याची खातरजमा करण्यासाठी 2024 मध्ये कालबाह्य होणारे स्पेक्ट्रम आणि 2022 मध्ये झालेल्या मागील स्पेक्ट्रम लिलावाचे न विकलेले स्पेक्ट्रम या वर्षी लिलावासाठी ठेवण्यात आले होते.

800 मेगाहर्ट्झ, 900 मेगाहर्ट्झ, 1800 मेगाहर्ट्झ, 2100 मेगाहर्ट्झ, 2300 मेगाहर्ट्झ, 2500 मेगाहर्ट्झ, 3300 मेगाहर्ट्झ, आणि 26 गिगाहर्टझ बँडमधील सर्व उपलब्ध स्पेक्ट्रम लिलावासाठी ठेवण्यात आले होते. या वर्षीच्या लिलावात 900 मेगाहर्ट्झ, 1800 मेगाहर्ट्झ, 2100 मेगाहर्ट्झ आणि 2500 मेगाहर्ट्झ बँडमध्ये लिलाव दिसून आला.

लिलाव 25 जून 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता सुरू झाला आणि 7 फेऱ्यांनंतर 26 जून 2024 रोजी सकाळी 11:45 वाजता संपला. 5G स्पेक्ट्रमसाठी लिलाव नुकताच झाला आणि 5G मुद्रीकरण अद्याप प्रगतीपथावर आहे, 800 मेगाहर्ट्झ, 2300 मेगाहर्ट्झ, 3300 मेगाहर्ट्झ आणि 26 गिगाहर्टझ बँडमधील स्पेक्ट्रमकरिता कोणतीही बोली लागली नाही. ऑगस्ट 2022 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्पेक्ट्रम म्हणजेच 51.2 Ghz स्पेक्ट्रम विकले गेले हे वास्तव असले तरी शिल्लक 533.6 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रममधून एकूण 141.4 मेगाहर्टझ (26.5%) ची विक्री झाली.

मेसर्स भारती एअरटेल लिमिटेड, मेसर्स रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड आणि मेसर्स व्होडाफोन आयडिया लिमिटेड या तीनही टीएसपींनी या लिलावामध्ये सेवांची वाढ आणि सातत्य यासाठी यशस्वीपणे बोली लावली आणि स्पेक्ट्रम घेतले. 11,340 कोटी रुपयांच्या एकूण 141.4 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमची विक्री झाली.

(सर्व मूल्ये मेगाहर्टझ मध्ये)

S.No

Name of the Bidder

900 MHz

1800 MHz

2100 MHz

2500 MHz

Total

1.

M/s Bharti Airtel Ltd.

42

35

20

 

97

2.

M/s Reliance Jio Infocomm Ltd.

 

14.4

 

 

14.4

3.

M/s Vodafone Idea Ltd.

18.8

1.2

 

10

30

Grand Total

60.8

50.6

20

10

141.4

Table 1: Band/bidder wise summary of quantum of spectrum sold
 

(All values in Rs crore)

S.No

Name of the Bidder

900 MHz

1800 MHz

2100 MHz

2500 MHz

Total

1.

M/s Bharti Airtel Ltd.

3825

2486.76

545

 

6856.76

2.

M/s Reliance Jio Infocomm Ltd.

 

973.62

 

 

973.62

3.

M/s Vodafone Idea Ltd.

3241.6

118.80

 

150

3510.40

Grand Total

7066.6

3579.18

545

150

11340.78

Table 2: Band/bidder wise summary of value of spectrum sold

 

मेसर्स भारती एअरटेल लि. आणि मेसर्स व्होडाफोन आयडिया लिमिटेड यांनी 900 मेगाहर्ट्झ आणि 1800 मेगाहर्ट्झ बँड्समध्ये कालबाह्य झालेल्या स्पेक्ट्रमचे यशस्वीरित्या नूतनीकरण केले तसेच 6164.88 कोटी रुपये मूल्याचे 87.2 मेगाहर्ट्झचे अतिरिक्त स्पेक्ट्रम त्यांच्या टीएसपी द्वारे विकत घेतले.

विक्री न झालेले स्पेक्ट्रम पुढच्या वेळी पुन्हा लिलावासाठी ठेवण्यात येतील.

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2028918) Visitor Counter : 46