कंपनी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने Byju’s कंपनी बाबतच्या वृत्ताचे खंडन केले

प्रविष्टि तिथि: 26 JUN 2024 9:31PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जून 2024

 

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून (एमसीए) सुरू असलेल्या तपासादरम्यान बायजूज (Byju's) कंपनीला आर्थिक घोटाळा प्रकरणी निर्दोष मुक्त केल्याचा दावा करणाऱ्या बातम्या अलीकडेच प्रसारित केल्या जात आहेत.

अशा बातम्या वस्तुस्थितीदृष्ट्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे. कंपनी कायदा, 2013 अंतर्गत एमसीए ने सुरू केलेली कार्यवाही अद्याप सुरू असून, या प्रकरणी या टप्प्यावर कोणताही अंतिम निष्कर्ष काढू नये.

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2028914) आगंतुक पटल : 113
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Hindi_MP , Gujarati , Tamil , Telugu