आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने “हज यात्रेसाठी वैद्यकीय सेवा व्यवस्था” या दस्तऐवजाचे केले प्रकाशन


दस्तऐवजाचे प्रकाशामुळे सौदी अरेबियातील भारतीय हज यात्रेकरूंसाठी अनेक भागधारकांचा समावेश असलेली सर्वसमावेशक आरोग्य सेवा योजना संस्थात्मक 

हज यात्रेकरूंच्या वैद्यकीय सेवेसाठी 356 डॉक्टर आणि पॅरामेडिक्स नियुक्त;  सुमारे 2 लाख बाह्य रुग्ण विभागांची निर्मिती; या वर्षी सुमारे 1,75,025 यात्रेकरूंनी केली हज यात्रा

Posted On: 21 JUN 2024 2:10PM by PIB Mumbai


 

केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज नवी दिल्लीत, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने, "हज यात्रेसाठी वैद्यकीय सेवा  व्यवस्था" नावाचे एक दस्तऐवज प्रकाशित केले. यावेळी जेद्दाहमधील भारताचे महावाणिज्य दूत मोहम्मद शाहिद आलम हे दूरदृश्य प्रणाली मार्फत उपस्थित होते. तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी आणि इतर भागधारक देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

"या दस्तऐवजात आरोग्य सेवांचा आराखडा आणि यात्रेकरूंना त्या सेवांचा कसा लाभ घेता येईल याची माहिती दिली आहे." असे अपूर्व चंद्रा यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे आरोग्य सेवेची जबाबदारी सोपवण्यात आल्यापासून हे केवळ दुसरे वर्ष असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या वर्षीच्या अनुभवातून बरेच काही शिकता आले असून त्यामुळे सेवेत सुधारणा करता आल्याचे त्यांनी सांगितले. 

या वर्षी भारतातील सुमारे  1,75,025  यात्रेकरूंनी हज यात्रा केली, त्यापैकी अंदाजे 40,000 हून अधिक यात्रेकरू 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. या वर्षीच्या प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर, आरोग्यविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी यात्रेकरूंना चोवीस तास आरोग्य सेवा उपलब्ध असणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.गेल्या वर्षीपासून मुख आरोग्य आणि दंत आरोग्य सेवा देखील आरोग्य सेवेमध्ये जोडल्या गेल्या आहेत.असे त्यांनी सांगितले.  वैद्यकीय पथकांनी यात्रेकरूंच्या गटांना भेटी देण्यासह  या वर्षी जवळपास 2 लाख बाह्य रुग्ण विभाग उघडण्यात आले होते अशी माहिती देखील केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिली.

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या (NIC) मदतीने एक लाइव्ह पोर्टल विकसित केले गेले आहे, असे अपूर्व चंद्र यांनी सांगितले.  हे पोर्टल वैद्यकीय सेवांची गरज असणारे यात्रेकरू आणि त्यांना प्रदान केल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा यांचा रियल टाईम डेटा आणि विश्लेषण प्रदान करते, हे त्यांनी स्पष्ट केले.  "आम्ही सतत देखरेख करत आहोत आणि यामुळे आम्हाला आमच्या सेवांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात मदत होईल. आणि ज्याद्वारे आम्ही इतर देशांद्वारे अनुकरण केले  जाईल असे उत्कृष्टतेचे दीपस्तंभ बनू," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या (NIC) पोर्टलची लिंक : https://hphis.ehospital.nic.in/

***

S.Kakade/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2027583) Visitor Counter : 73