ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बाजारात उतरवण्यासाठी पुरेसा गव्हाचा साठा उपलब्ध: केंद्र


रब्बी विपणन हंगाम 2024 मध्ये 18 जून 2024 पर्यंत 266 लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी; रब्बी विपणन हंगाम 2023 मध्ये खरेदी 262 लाख मेट्रिक टन होती

प्रविष्टि तिथि: 20 JUN 2024 6:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जून 2024

 

जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय गृह आणि  सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झाली.

गव्हाचा साठा व भाव याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.रब्बी विपणन हंगाम 2023 मधील 262 लाख मेट्रिक टन गहू खरेदीच्या तुलनेत रब्बी विपणन हंगाम 2024 मध्ये 18 जून 2024 पर्यंत 266 लाख मेट्रिक टन गहू खरेदी करण्यात आला आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) आणि इतर कल्याणकारी योजनांची आवश्यकता पूर्ण केल्यानंतर, अंदाजे 184 लाख मेट्रिक टन इतका गव्हाचा पुरेसा साठा गरजेनुसार बाजारात उतरवण्यासाठी उपलब्ध आहे.

गव्हाच्या किमतींवर बारकाईने नजर ठेवली जावी आणि देशातील ग्राहकांसाठी किंमत स्थिर राहण्याची खातरजमा करण्यासाठी योग्य धोरणात्मक हस्तक्षेप केला जावा असे निर्देश केंद्रीय मंत्र्यांनी दिले.

 

S.Tupe/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2027128) आगंतुक पटल : 97
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Hindi_MP , Odia , Tamil , Kannada