पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी शशांकासनाचा व्हिडिओ केला सामायिक
Posted On:
19 JUN 2024 12:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जून 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शशांकासन (सशासमान आसन), या बद्धकोष्ठता दूर करण्यात मदत करणाऱ्या आणि पचन प्रक्रिया सुधारणाऱ्या योगासनाची एक चित्रफीत सामायिक केली आहे. या आसनामुळे पाठदुखीपासूनही आराम मिळतो. हे आसन करताना उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
लवकरच साजऱ्या केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 10 व्या आवृत्तीच्या निमित्ताने सामायिक केलेली ही चित्रफीत, इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये आसन करण्याच्या पद्धतीचे देखील तपशीलवार वर्णन करते.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
“शशांकासनाचा नियमित अभ्यास करणे का आवश्यक आहे, चला जाणून घेऊ…”
* * *
NM/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2026445)
अभ्यागत कक्ष : 105
Read this releasein:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam