राष्ट्रपती कार्यालय
इद-उल-जुहा निमित्त राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
16 JUN 2024 7:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जून 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी इद-उल-जुहा निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात सांगितले की “इद-उल-जुहा या पवित्र सणाच्या निमित्ताने मी सर्व भारतीय नागरिकांना आणि परदेशातील भारतीय बांधवांना, विशेषतः आमच्या मुस्लिम बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा देते.
इद-उल-जुहा हा पवित्र सण त्याग आणि बलिदानाचे प्रतीक आहे. तो प्रेम, बंधुत्व आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देतो. हा सण आपल्याला मानवतेची नि:स्वार्थ सेवा करण्यास प्रेरित करतो.
या प्रसंगी, आपण एकत्र येऊन आपल्या राष्ट्राचा विकास आणि कल्याणासाठी कार्य करण्याचा संकल्प करूया.”
राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
S.Kane/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2025745)
Visitor Counter : 78