गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झाली जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक
Posted On:
16 JUN 2024 6:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जून 2024
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथे जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, केंद्रीय गृहसचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, लष्कर प्रमुख (नियुक्त) लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी, यांच्यासह सीएपीएफ चे महासंचालक, मुख्य सचिव, जम्मू-काश्मिरचे पोलिस महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जम्मू विभागात क्षेत्र वर्चस्व योजना आणि शून्य दहशतवाद योजनेद्वारे काश्मीर खोऱ्यात मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती करण्याचे निर्देश, केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुरक्षा यंत्रणांना दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार नाविन्यपूर्ण माध्यमातून दहशतवाद्यांचा मुकाबला करून आदर्श घालून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे शाह यांनी प्रतिपादन केले.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाविरुद्धची लढाई निर्णायक टप्प्यात आहे. ते पुढे म्हणाले की, अलीकडील घटनांवरून असे दिसून येते की दहशतवादाला आता अतिरेकी हिंसाचाराच्या अत्यंत संघटित कृत्यांपासून केवळ छुप्या युद्धापर्यंत मर्यादित रहायला भाग पडत आहे. आता हे देखील मुळापासून उखडून टाकण्याचा आमचा निर्धार आहे, यावर त्यांनी भर दिला.
असुरक्षित क्षेत्रे ओळखून अशा क्षेत्रांच्या सुरक्षेची चिंता दूर करणाऱ्या सुरक्षा यंत्रणांमधील अखंड समन्वयावर,अमित शहा यांनी भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरणाचा पुनरुच्चार करत गृहमंत्री म्हणाले की,सरकार जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट होऊन मोठे सकारात्मक परिणाम मिळाले आहेत.काश्मीर खोऱ्यातील पर्यटकांच्या वाढत्या विक्रमी संख्येवरून, इथे कायदा आणि सुव्यवस्थेत झालेली सुधारणा दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले. जम्मू आणि काश्मीरमध्ये विक्रमी मतदान घडवून आणलेल्या लोकसभा निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल शाह यांनी सुरक्षा यंत्रणा आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाचे कौतुक केले.
S.Kane/A.Save/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2025719)
Visitor Counter : 99