पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उत्तराखंड बस दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांना शोक, पीडितांना मदत जाहीर

Posted On: 15 JUN 2024 7:44PM by PIB Mumbai

 

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी अपघातातील मृतांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त केली असून, जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर म्हटले आहे:

उत्तराखंड मध्ये रुद्रप्रयाग येथील रस्ते अपघात दुःखदायक आहे. अपघातात आपल्या प्रियजनांना गमावणाऱ्या शोकाकुल कुटुंबांप्रति सह-वेदना. त्याचबरोबर अपघातातील जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करत आहे: पीएम"

पंतप्रधानांनी अपघातग्रस्तांना सानुग्रह अनुदानही जाहीर केले आहे.

पोस्टनुसार, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून, मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत दिली जाईल.

पंतप्रधान कार्यालयाने (PMO) X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:

"प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला PMNRF मधून 2 लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत दिली जाईल: पीएम"

***

M.Pange/R.Agashe/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2025614) Visitor Counter : 90