श्रम आणि रोजगार मंत्रालय

कामगार सचिवांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना सुधारणांबाबत आढावा बैठक

Posted On: 14 JUN 2024 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जून 2024


कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांच्या अध्यक्षतेखाली 13 जून 2024 रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधि संघटना (ईपीएफओ) मधील सुधारणांबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त (सीपीएफसी) नीलम शमी राव व कामगार आणि रोजगार मंत्रालय आणि ईपीएफओचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डावरा यांनी स्वयंचलित सेटलमेंट्स आणि दाव्यांच्या त्वरित निकालासाठी लागणारा वेळ कमी करणे या कर्मचारी भविष्य निधि संघटनेने उचललेल्या अलीकडच्या पावलांचे कौतुक केले. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आजारपण, शिक्षण, लग्न आणि घरासाठी 1 लाख रुपयांपर्यंतच्या आगाऊ दाव्यांसाठी स्वयंचलित तडजोड प्रणाली लागू केली आहे. स्वयंचलित प्रक्रियेनंतर अंदाजे 25 लाख रुपयांचे आगाऊ दावे निकाली काढण्यात आले आहेत. आतापर्यंत निकाली निघालेले 50 टक्क्यांहून अधिक आजारांचे दावेही आपोआप निकाली निघाले आहेत.यामुळे दावे निकाली काढण्याचा वेग वाढला आहे आणि त्यापैकी मुख्य बाब म्हणजे आता नेमक्या 03 दिवसांत दावे निकाली काढले जात आहेत.

सदस्यांच्या (केवायसी) आधार जोड खात्यांसाठी बँक खात्यावर अपलोड केलेल्या चेकबुक/पासबुकची तरतूद सुलभ करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या एका महिन्यात अंदाजे 13 लाख दाव्यांच्या चौकशीची फारशी गरज भासली नाही.

सदस्यांना समजणे सोपे व्हावे यासाठी कर्मचारी भविष्य निधि संघटनेने अपूर्ण प्रकरणे परत पाठवणे आणि अपात्र प्रकरणे नाकारण्याची प्रक्रिया सुलभ आणि तर्कसंगत केली आहे.

स्वयंचलित हस्तांतरणाच्या संख्येतही तिपटीने वाढ झाली आहे, एप्रिल 2024 मध्ये 2 लाखांवरून  मे 2024 पर्यंत 6 लाखांपर्यंत वाढ यात नोंदवली गेली आहे. डावरा यांनी पद्धतशीर सुधारणांसाठी असेच सक्रीय उपाय सुरू ठेवण्याचा सल्ला दिला.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना प्रत्येक सदस्यासाठी यूएनए आधारित सिंगल अकाउंटिंग सिस्टम आणि कमीतकमी मानवी हस्तक्षेपासह दाव्यांच्या जलद निकालाकरिता स्वयंचलित यंत्रणेसह त्याचे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर सुधारण्याच्या प्रक्रियेसाठी प्रयत्नशील आहे.

प्रगत संगणक विकास केंद्र (सीडीएसी) यांच्याशी सल्लामसलत करून यासाठी नवीन सॉफ्टवेअर विकसित केले आहे.

आढावा बैठकीत सामाजिक सुरक्षेचा विस्तार आणि राहणीमान आणि व्यवसाय सुलभतेसाठी नवीन उपक्रमांची गरज अधोरेखित करण्यात आली. शिवाय तक्रार व्यवस्थापन  आणि लेखापरीक्षण मधील कार्यात्मक सुधारणांवरही बैठकीत चर्चा झाली.

त्याचबरोवर डावरा यांनी अधिकाऱ्यांना प्रभावी सामाजिक सुरक्षा व्यवस्थेसाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.


S.Patil/G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2025416) Visitor Counter : 29