ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाचा स्वीकारला पदभार

प्रविष्टि तिथि: 12 JUN 2024 4:08PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 12 जून 2024


केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम.सिंधिया यांनी आज ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाचा पदभार स्वीकारला.

ईशान्य क्षेत्र विकास विभाग (डीओएनईआर) मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. मजुमदार यांच्यासह  ईशान्य क्षेत्र विकास विभाग मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत केले. पदभार स्वीकारल्यानंतर सिंधिया यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध योजनांचा आढावा घेतला.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सिंधिया म्हणाले की,“पंतप्रधानांनी नेहमीच ईशान्य क्षेत्राला प्राधान्य दिले आहे आणि आम्ही पंतप्रधानांचे ध्येय साकार करण्यासाठी कटिबद्ध आहोत. या प्रदेशाच्या विकासाला गती देणे आणि आधुनिक विकासाचे नवे मानदंड प्रस्थापित करणे ही आमची वचनबद्धता आहे.”असे त्यांनी यावेळी सांगितले.


N.Chitale/G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2024705) आगंतुक पटल : 112
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Khasi , English , Urdu , हिन्दी , Hindi_MP , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Malayalam